आजपासून 10 नवीन वंदे भारत ट्रेन्स सुरु! PM मोदींनी केलं लोकार्पण, पुणे- हुबळी- कोल्हापूरचाही समावेश
PM Modi inaugurated 10 new Vande Bharat trains, including Pune-Hubli-Kolhapur : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात आज 10 नव्या वंदे भारत ट्रेनला ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवला आहे.
पुण्यातून सुरू झालेल्या पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण आज सोमवारपासून पुणे रेल्वे स्थानकावरून दुपारी 4.15 वाजता होत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन झाल्यानंतर केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ 'वंदे भारत'ला हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यानंतर 'वंदे भारत'हुबळीसाठी रवाना झाली.

पुणे-हुबळी आणि पुणे कोल्हापूर अशी प्रत्येकी तीन दिवस धावणारी 'वंदे भारत' सुरू झाली. त्यामुळे पुणे-कोल्हापूरदरम्यान प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर ते पुणे 'वंदे भारत एक्स्प्रेस'ची शनिवारी झालेली चाचणी यशस्वी झाली. ती निर्धारित वेळेत पुण्यात दाखल झाली. या 'वंदे भारत'ला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ पुणे रेल्वे स्टेशन येथून हिरवा झेंडा दाखवला.
आजपासून 10 नवीन वंदे भारत ट्रेन्स सुरु
देशात आज एकाचवेळी 10 वंदे भारत ट्रेन्स सुरु होणार आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदीजमशेदपूर, झारखंड येथून या ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवणार आहेत.देशात पहिल्यांदाच एकाच वेळी दहा वंदे भारत गाड्या सुरू होणार आहेत.मोदी सरकारच्या 'मेक इन इंडिया' संकल्पनेअंतर्गत पहिली वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आणि, तेव्हापासून भारतात या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा विस्तार वेगाने होत आहे. दररोज विविध राज्यांमध्ये वंदे भारत ट्रेनचा शुभारंभ होत आहे.
'या' राज्यांमधून धावणार वंदे भारत ट्रेन्स
महाराष्ट्र, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश राज्यातून या 10 वंदे भारत ट्रेन्स धावतील. 15 सप्टेंबरपासून धावणाऱ्या 10 वंदे भारत ट्रेनपैकी बहुतांश ट्रेन बिहारमधून जाणार आहेत. ईस्ट कोस्ट रेल्वेच्या म्हणण्यानुसार, 15 सप्टेंबरपासून आणखी तीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या ओडिशातून धावतील. ओडिशातून जाणाऱ्या नवीन गाड्या टाटा-बरहामपूर, राउरकेला-हावडा आणि दुर्ग-विशाखापट्टणम वंदे भारत एक्स्प्रेस आहेत. या 3 ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
झारखंड में हिन्दुस्तान का सबसे समृद्ध राज्य बनने की क्षमता है। हमारी सरकार विकसित झारखंड, विकसित भारत के लिए संकल्पित है। आज टाटानगर में कई विकास परियोजनाओं का उद्घाटन और शिलान्यास कर गर्व की अनुभूति हो रही है।https://t.co/9Cl6bBSjxQ
— Narendra Modi (@narendramodi) September 15, 2024
वंदे भारत ट्रेनची खासियत
-ही ट्रेन पूर्णपणे म्हणजेच 100 टक्के स्वदेशी आहे.
-वंदेभारत ट्रेनचा वेग अगदी कमी वेळात 160 किलोमीटर प्रतितास ते 200 किलोमीटर प्रति तास इतका वाढतो.
-भारतीय गाड्यांमध्ये इंजिनला वेगळा डबा असतो. पण वंदे भारत ट्रेनमध्ये मेट्रो ट्रेनप्रमाणे इंटिग्रेटेड इंजिन आहे.
-ही ट्रेन अवघ्या 52 सेकंदात 100 किलोमीटरचा वेग गाठते.
-ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्यात आले आहेत. मेट्रोप्रमाणेच हे दरवाजे आपोआप उघडतात. ही ट्रेन अनेक आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे.
-सर्व डबे वातानुकुलीन आहेत.
-त्यातील स्टिंग चेअर 360 अंश फिरतात.
-या ट्रेनमध्ये जेवण आणि नाश्ताही दिला जातो. ज्याची किंमत तिकिटातच समाविष्ट आहे.
-प्रवाशांची सोय लक्षात घेऊन ट्रेनमध्ये पूर्णपणे ऑनबोर्ड वायफाय सुविधा देण्यात आली आहे. तसेच मोबाईल आणि लॅपटॉप चार्ज करण्यासाठी प्रत्येक सीटखाली चार्जिंग पॉईंट देण्यात आले आहेत.
-वंदे भारत ट्रेनमध्ये जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे. ज्याद्वारे आगामी स्थानकांची माहिती आणि इतर माहिती उपलब्ध होते.
-स्वच्छता लक्षात घेऊन ट्रेनमध्ये बायो व्हॅक्यूम टॉयलेट बांधण्यात आले आहेत. विमानात वापरल्या जाणाऱ्या.
-ट्रेनबाहेरचे दृश्य स्पष्टपणे पाहता यावे यासाठी मोठे काचा लावण्यात आले आहेत.
-प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत.
-प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून, जेव्हा ट्रेन पूर्णपणे थांबेल तेव्हाच दरवाजे उघडतील. जेणेकरून प्रवासी चालत्या ट्रेनमध्ये चढू किंवा उतरू शकत नाहीत.
-वंदे भारत ट्रेन बनवताना दिव्यांगांचाही विचार करण्यात आला आहे. ट्रेनच्या काही डब्यांमध्ये व्हीलचेअर ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा तयार करण्यात आली आहे.












Click it and Unblock the Notifications