Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नागपूर-पुण्यासाठी मोठे गिफ्ट! 4 राज्यांना मिळणार वंदे भारत ट्रेन! PM मोदींच्या हस्ते आज लोकार्पण

PM Modi inaugurate Vande Bharat train today big gift of Nagpur Pune : वंदे भारत ट्रेनची संख्या देशभरात हळूहळू वाढत आहे. १० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन वंदे भारत ट्रेनना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटकच्या दौऱ्यावर असून आज बंगळुरू इथं ते केएसआर रेल्वे स्थानकावरुन या नव्या वंदे भारत रेल्वेचे लोकार्पण करतील.

केएसआर बंगळुरू-बेळगावी वंदे भारत एक्सप्रेस, श्री माता वैष्णो देवी कटरा - अमृतसर वंदे भारत एक्सप्रेस, नागपूर (अजनी) - पुणे वंदे भारत अशा एक्सप्रेस मिळणा आहेत. या वंदे भारत ट्रेन कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटनात आणि एकूणच दळणवळणात महत्वाची भूमिका पार पाडेल आणि येथील आर्थिक घडामोडींना वेग येईल.

PM Modi inaugurate Vande Bharat train today

नागपूर पुणे वंदे भारतची मिळणार भेट (Nagpur pune new Vande Bharat train)

नागपूर आणि पुण्याची रेल्वे कनेक्टिव्हीटी कमी आहे, म्हणूनच दोन शहरांसाठी दळणवळण वाढवण्यासाठी प्रवासाची सोय व्हावी म्हणून वंदे भारत ट्रेन असावी ही नागपूर आणि पुणेकरांची मोठी मागणी होती, आता या मागणीला यशही आले आणि आजपासून ट्रेनही सुरु होत आहे.

सध्या कोणत्या राज्यात किती वंदे भारत ट्रेन आहेत?

  • नागपूर(अजनी) -पुणे वंदे भारत ट्रेन मिळाल्यानंतर महाराष्ट्रात वंदे भारत ट्रेनची संख्या १२ (२४ सेवा) होईल.
  • कर्नाटकमध्ये वंदे भारत ट्रेनची संख्या आता ११ (२२ सेवा) होईल.
  • जम्मू आणि काश्मीरमध्ये वंदे भारत ट्रेनची एकूण संख्या ५ (१० सेवा) होईल.
  • पंजाबमध्ये आता एकूण ५ वंदे भारत (१० सेवा) उपलब्ध असतील.
  • सध्या देशभरात १४४ वंदे भारत ट्रेन सेवा चालवल्या जात आहेत.
  • या तीन ट्रेनच्या समावेशामुळे देशभरातील वंदे भारत ट्रेन सेवांची संख्या १५० पर्यंत वाढेल.

आतापर्यंत किती लोकांनी वंदे भारतमधून केला प्रवास?

आतापर्यंत ६.३ कोटींहून अधिक लोकांनी वंदे भारत ट्रेनने प्रवास केला आहे.

नवीन गाड्या आणि त्यांचे प्रमुख थांबे कोणते?

1. नागपूर (अजनी)-पुणे वंदे भारत एक्सप्रेस

प्रमुख थांबे: वर्धा, बडनेरा, शेगाव, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर, दौंड मार्ग मार्ग
महाराष्ट्रात नागपूर (अजनी)-पुणे वंदे भारत ट्रेन सेवा सुरू झाल्यामुळे, राज्यातील वंदे भारत ट्रेनची संख्या १२ (२४ सेवा) होईल.

2. KSR बेंगळुरू-बेलागावी वंदे भारत एक्सप्रेस

प्रमुख थांबे: धारवाड, हुबळी, हावेरी, दावणगेरे, तुमकूर आणि यशवंतपूर

3. श्री माता वैष्णो देवी कटरा-अमृतसर वंदे भारत एक्सप्रेस

प्रमुख थांबे: जम्मू तवी, पठाणकोट कँट, जालंधर शहर आणि बियास.

काय आहे मुख्य सोई-सुविधा

सेमी-हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेस पूर्णपणे स्वदेशी असून ती कवच प्रणालीने सुसज्ज आहे.

या ट्रेनमध्ये फोल्डेबल स्नॅक टेबल, मोबाईल चार्जिंग पोर्ट, आरामदायी सीट्स, आधुनिक टॉयलेट आणि इन्फोटेनमेंट सारख्या सुविधा देखील आहेत.

प्रत्येक कोचमध्ये जीपीएस आधारित रिअल-टाइम ट्रॅकिंग सिस्टम बसवण्यात आली आहे, ज्याद्वारे प्रवाशांना प्रत्येक क्षणी स्टेशन, वेग आणि स्थानाची माहिती मिळते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+