Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

विमानतळावर स्वतः उपस्थित राहिले, गळाभेटही घेतली... कतारच्या अमिरचे पीएम मोदींनी केले स्वागत

कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी सोमवारी संध्याकाळी दिल्लीला पोहोचले. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले. कतारचे अमीर शेख हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या भेटीदरम्यान ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतील.

Welcoming the Emir of Qatar

मोदी स्वतः विमानतळावर

पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणावरून अमिर अल-थानी हे भारतात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः त्यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर पोहोचले. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मिठी मारली. "एका खास मित्रासाठी खास भावना, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी कतारचे अमीर शेख यांचे स्वागत केले. भारताच्या दुसऱ्या राजकीय दौऱ्यावर आलेले अमिर थानी यांचे मिठी मारत पंतप्रधान मोदी यांनी नवी दिल्ली विमानतळावर स्वागत केले. या भेटीमुळे भारत-कतार भागीदारी आणखी मजबूत होईल," असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

हा दुसरा भारत दौरा

कतारच्या अमीरसोबत मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि व्यावसायिक शिष्टमंडळही दिल्लीत आले आहे. कतारच्या अमीरचा हा दुसरा भारत दौरा आहे. यापूर्वी तो मार्च २०१५ मध्ये भारतात आले होता. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आज अल-थानी यांच्या आगमनानंतर त्यांना भेटतील. तर राष्ट्रपती मुर्मू आणि पंतप्रधान मोदी हे त्यांची उद्या सविस्तर भेट घेणार आहेत.

उद्या राष्ट्रपतींची भेट

उद्या म्हणजेच मंगळवारी सकाळी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात कतारच्या अमीरचे औपचारिक स्वागत केले जाईल. त्यानंतर हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींशी त्यांची भेट होईल. परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी एका निवेदनात म्हटले आहे की, ते पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा करतील. निवेदनानुसार, मंगळवारी दुपारी सामंजस्य करारांची देवाणघेवाण होईल, त्यानंतर कतारचे अमीर राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतील. अलिकडच्या काळात, भारत आणि कतारमधील संबंध व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संस्कृतीसह विविध क्षेत्रात सतत मजबूत झाले आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+