वचन पूर्ण करून आलोय, आमच्या सेनेने पाकिस्तानात... मोदी काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या बिहार दौऱ्यावर असून शुक्रवारी (२० मे) त्यांनी काराकाट येथील जनसभेत प्रभावी भाषण करत जनता आणि विरोधकांचे लक्ष वेधले. या दौऱ्याचा आज दुसरा दिवस असून मोदींनी अनेक महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन केले.

काराकाटमध्ये रोड शो आणि जनसभा
पंतप्रधान मोदींनी बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या समवेत काराकाटमध्ये भव्य रोड शो केला. तीनही नेते सनरूफ वाहनात उभे राहून लोकांना अभिवादन करत होते. यानंतर मोदींनी जनतेला संबोधित करत आपल्या सरकारच्या कामगिरीची साक्ष देणारे उद्गार काढले.
"बिहारचं प्रेम माझ्या डोक्यावर" - मोदी
मोदी म्हणाले, "बिहारचं प्रेम सदैव डोक्यावर असतं. मी खास मातां-बहिणींना प्रणाम करतो. काही काळापूर्वी जेव्हा पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा मी बिहारच्या भूमीतून सांगितलं होतं की दहशतवाद्यांना त्यांच्या अड्ड्यांसह नष्ट केलं जाईल. आज मी ते वचन पूर्ण करूनच इथे आलो आहे. आमच्या सेनेने त्यांच्या ठिकाणांना उध्वस्त करून टाकलं आहे."
"ऑपरेशन सिंदूरमधून भारताची ताकद दाखवली"
पुढे बोलताना मोदी म्हणाले, "ऑपरेशन सिंदूरमधून भारताची जी ताकद दिसली, ती फक्त आमच्या बाणांपैकी एक बाण आहे. दहशतवादाविरोधातील आमची लढाई थांबलेली नाही. दहशतवाद पुन्हा डोके वर काढेल तर भारत त्याला बिळातून ओढून काढून नष्ट करेल. देशाच्या सीमेबाहेरच नव्हे तर आतल्याही शत्रूंविरोधात आमची लढाई सुरू आहे."
नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईचा उल्लेख
मोदींनी सासाराम, कैमूर आणि आसपासच्या भागांतील नक्षलवादी परिस्थितीची आठवण करून दिली. "कधीही नक्षलवादी गावांमध्ये येत आणि रस्त्यांवर बंदूक घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करत. सरकारी योजना पोहचत नव्हत्या. आता परिस्थिती बदली आहे. नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली विकासाची गती वाढली आहे," असंही त्यांनी नमूद केलं.
विकास प्रकल्पांचं लोकार्पण व भूमिपूजन
पंतप्रधान मोदींनी अनेक विकास योजनांचे लोकार्पण केले, त्यामध्ये प्रमुख रस्ते, रेल्वे आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांचा समावेश आहे. विक्रमगंजहून २४९ कोटी रुपये खर्चाच्या पटना-गया-डोभी फोरलेन रस्त्याचं उद्घाटन, गोपालगंजमधील एलिवेटेड रोड, तसेच सासाराम ते अनुग्रह नारायण रोड दरम्यान ऑटोमेटिक सिग्नलिंग, सोननगर-मुहम्मदगंज दरम्यान तिसरी रेल्वे लाईन अशा योजनांचा समावेश होता.
१०८३ कोटींच्या प्रकल्पांचा भूमिपूजन
मोदींनी नवीनगर विद्युत प्रकल्पात ८०० मेगावॅटच्या तीन युनिट्स, गंगा नदीवरील बक्सर-भरौली पुल, रामनगर-कच्ची दरगाह एनएच-११९ डी या मार्गावर पूल आणि नवीन रस्त्यांचे भूमिपूजन केले. याची अंदाजे किंमत १०८३ कोटी रुपये आहे. तसेच पटना-आरा-सासाराम चार लेन रस्ता आणि वाराणसी-रांची-कोलकाता मार्ग सहा लेन करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री नीतीश कुमार यांची उपस्थिती
मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी देखील एनडीए सरकारच्या कार्यांची माहिती दिली. "महिलांसाठी आम्ही ३५% आरक्षण दिलं. राज्यात मोठ्या प्रमाणावर पूल, शाळा, रस्ते उभारण्यात आले आहेत. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात विशेष लक्ष दिलं जात आहे," असं त्यांनी सांगितलं.
पंतप्रधान मोदींचा बिहार दौरा हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांनी विकासाच्या मुद्यांवर जोर देत राष्ट्रीय सुरक्षेपासून ते ग्रामीण विकासापर्यंत अनेक विषयांवर भाष्य केलं.
-
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा









Click it and Unblock the Notifications