PM kisan yojana: 'पीएम किसान'चे 2 हजार रुपये खात्यात आले नाही का? या नंबरवर कॉल करा आणि जाणून घ्या
PM kisan yojana helpline number email id : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता जारी करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील भागलपूर येथून डीबीटीद्वारे देशातील 9 कोटी 81 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 22 हजार कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. बिहारमधील 75 लाखांहून अधिक तर महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे.
पंतप्रधान सन्मान निधी योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आधार देणे हा आहे. शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागते. अतिवृष्टी असो की, नापिकी शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून सन्मान निधी म्हणून दर चार महिन्यांना आर्थिक मदत दिली जाते.

काय आहे योजना?
या योजनेतून शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये दिले जातात. जर या योजनेचा 19 वा हप्ता तुमच्या खात्यात अद्याप जारी झाला नसेल, तर तुम्ही कॉल करून किंवा वेबसाइटद्वारे सहजपणे तक्रार करू शकता. शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार हस्तांतरित (PM kisan helpline number) शेतकऱ्यांना PM किसान योजनेद्वारे आर्थिक मदत दिली जाते. किसान सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता सरकारने सन 2025 मध्ये प्रथमच दिला आहे. PM किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. दर चार महिन्यांनी 2 हजार रुपये ट्रान्सफर केले जातात. "
पंतप्रधान किसान योजना कधी सुरू झाली?
देशभरातील जमीनधारक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी पंतप्रधान किसान योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली. ही आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे पाठवली जाते जेणेकरून शेतकऱ्यांना हे पैसे कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळतील. पण काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेले नाही किंवा बऱ्याचदा तांत्रिक कारणांमुळे ते अडकतात. अशावेळी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधणे आवश्यक असते.
खात्यात पैसे आले नाही तर हे करा...
- जर पैसे अद्याप तुमच्या खात्यात आले नाहीत, तर त्यासाठी तुम्ही टोल फ्री क्रमांक 1800-11-5526 या पीएम किसान सन्मान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर आपण काॅल करु शकता आणि त्याबद्दल माहिती घेऊ शकता.
- याशिवाय तुम्ही हेल्पलाइन क्रमांक 155261 आणि कस्टमर केअर 011-23381092 वरही तक्रार नोंदवू शकता.
- आपण 23382401 वर देखील शोधू शकता. याशिवाय तुमची समस्या सुटत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या स्थानिक कृषी अधिकाऱ्याकडे जाऊन तक्रार करू शकता.
- तुम्ही अधिकृत ईमेल आयडी - [email protected] वर मेल करू शकता आणि या योजनेतून पैसे न मिळण्याची समस्या मांडू शकता.
- जर PM किसान योजनेची रक्कम तुमच्या खात्यात पोहोचली नसेल, तर त्यामागे काही महत्त्वाची कारणे असू शकतात.
- तुम्ही ई-केवायसी आणि जमीन पडताळणी पूर्ण केली नसेल, तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत.
- याशिवाय, जर तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केले नसेल, तर यामुळे तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होणार नाहीत.
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी






Click it and Unblock the Notifications