Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

PM-Kisan 20th installment: अखेर ठरलं! या दिवशी मिळणार PM किसान सन्मान निधीचा हप्ता, चेक कसा करायचा?

PM Kisan 20th installment Latest Marathi News : लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KIsan) योजनेचा 20वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुक्रवार, 18 जुलै 2025 रोजी पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, ही विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती समोर आलेली आहे.

PM kisan sanman nidi yojna

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणा?

आगामी बिहार विधानसभा निवडणुका लक्षात घेता, पंतप्रधान नरेंद्र मोदी याच आठवड्यात बिहार दौऱ्यावर असणार आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान 18 जुलै रोजी मोतिहारी (पूर्व चंपंपारण) येथे एका मोठ्या जाहीर सभेला संबोधित करण्याची शक्यता आहे.

याच कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी देशभरातील 9.8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 2000 रुपये हस्तांतरित करण्यासाठी बटण दाबतील, अशी माहिती विश्वसनिय सूत्रांकडून मिळालेली आहे.

पीएम-किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा

तुम्ही पीएम-किसान योजनेचे लाभार्थी असाल किंवा लाभ घेण्यास इच्छुक असाल, तर या पाच महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे:

  • बँक खाते आधार कार्डशी जोडा: तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्डशी जोडलेले (लिंक) असल्याची खात्री करा.
  • आधार सीडिंग स्थिती तपासा: बँक खात्याच्या स्थितीसह तुमचे आधार सीडिंग योग्यरित्या झाले आहे का, हे तपासा.
  • डीबीटी पर्याय सक्रिय ठेवा: तुमच्या आधार सीड केलेल्या बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) चा पर्याय सक्रिय (Active) ठेवा.
  • ई-केवायसी पूर्ण करा: तुमचे ई-केवायसी (e-KYC) पूर्ण केलेले असणे अनिवार्य आहे.
  • पोर्टलवर आधार सीडिंग स्थिती तपासा - पीएम-किसान पोर्टलवर 'तुमची स्थिती जाणून घ्या' (Know Your Status) मॉड्यूल अंतर्गत तुमच्या आधार सीडिंगची स्थिती तपासा.

लाभार्थी यादीत तुमचे नाव कसे तपासाल?

तुम्ही पीएम-किसान योजनेच्या लाभार्थी यादीत तुमचे नाव खालीलप्रमाणे तपासू शकता:

  • प्रथम, अधिकृत पीएम किसान वेबसाइट https://pmkisan.gov.in/ ला भेट द्या.
  • होमपेजवर, तुम्हाला 'पेमेंट सक्सेस' टॅब अंतर्गत भारताचा नकाशा दिसेल.
  • नकाशाच्या उजव्या बाजूला, "डॅशबोर्ड" (Dashboard) नावाचा पिवळ्या रंगाचा टॅब असेल, त्यावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर, तुम्ही एका नवीन पृष्ठावर (Page) पोहोचाल.
  • येथे 'व्हिलेज डॅशबोर्ड' (Village Dashboard) टॅबवर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरावी लागेल.
  • तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा (तालुका) आणि पंचायत (ग्रामपंचायत) निवडा.
  • त्यानंतर 'शो' (Show) बटणावर क्लिक करा.
  • या माहितीनंतर, तुम्ही तुमची निवडलेली माहिती पाहू शकता.
  • 'रिपोर्ट मिळवा' (Get Report) बटणावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव दिसेल.

पीएम-किसानचा 19वा हप्ता कधी मिळाला होता?

यापूर्वी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) चा १९वा हप्ता या वर्षी फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान मोदींनी बिहारमध्येच एका कार्यक्रमात जारी केला होता.

त्यावेळी देशभरातील २.४१ कोटी महिला शेतकऱ्यांसह एकूण ९.८ कोटी शेतकऱ्यांना पीएम-किसान योजनेचा १९वा हप्ता थेट हस्तांतरित करण्यात आला होता. यातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) द्वारे २२,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त थेट आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळाली होती.

आता शेतकऱ्यांना मिळणार दिलासा..!

20 व्या हप्त्याच्या घोषणेने आता शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार असून, येत्या काही दिवसांतच त्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होण्याची अपेक्षा आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+