PM Kisan Installment : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता 'या' दिवशी मिळणार
PM Kisan Installment : देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या वतीने दिला जाणारा पीएम किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता लवकरच दिला जाणार आहे.
त्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता कधी दिला जाणार याची तारीख देखील समोर आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी पावसाच्या दिवसात थोडासा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 जून रोजी सारण विभागातील सिवान जिल्ह्यातील पचरुखी येथील जसोली या ठिकाणी विशाल सभेला संबोधित करणार असून याच कार्यक्रमात ते देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता ऑनलाईन ट्रान्सफर करणार आहेत. एक बटन दाबून देशभरातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग केली जाणार आहे.

सारणच्या भूमीत होणार 20 व्या हप्त्याची सुरूवात!
6 हजार रुपयांच्या वार्षिक मदतीअंतर्गत, शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये दिले जातात, ज्यापैकी 20 वा हप्ता सारण विभागाच्या जमिनीतून पहिल्यांदाच वितरित केला जाऊ शकतो. या प्रसंगी, पंतप्रधान मोदी मधुरा येथील डिझेल रेल इंजिन कारखान्यातून उत्पादित डिझेल इंजिनची पहिली खेप आफ्रिकन देश गिनीला पाठवतील. या उपक्रमामुळे मेक इन इंडिया ते मेक फॉर वर्ल्डच्या दिशेने सारणची भूमिका बळकट होईल.
या राज्यातील शेतकऱ्यांना होणार डबल फायदा!
मध्य प्रदेश सरकारने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मुख्यमंत्री किसान कल्याण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, ज्या शेतकऱ्यांना आधीच पीएम-किसान योजनेअंतर्गत वार्षिक 6 हजार रुपये (तीन हप्त्यांमध्ये 2 हजार रुपये) मिळत आहेत.
त्यांना राज्य सरकारकडून अतिरिक्त 6 हजार रुपये दिले जातात. याचा अर्थ असा की मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना आता वार्षिक एकूण 12,000 रुपये मिळतील, जे त्यांच्या बँक खात्यात तीन हप्त्यांमध्ये 4,000 रुपयांच्या स्वरूपात जमा केले जातील.
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री निधीतून कधी मिळणार हप्ता?
असाच प्रकार महाराष्ट्रात देखील आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या वतीने देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री किसान सन्मान निधीच्या अंतर्गत सहा हजार रुपये दिले जात आहेत. महाराष्ट्रातील पुढील हप्ता कधी मिळणार याबाबत मात्र अद्याप अपडेट आलेली नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील डबल लाभ मिळत आहे.












Click it and Unblock the Notifications