ठरलं! 'या' दिवशी मिळणार पीएम किसानचा हप्ता; 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार रक्कम
PM kisan 22nd installment date : देशातील करोडो बळीराजासाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, त्या 'पीएम किसान सन्मान निधि' योजनेच्या २२ व्या हप्त्याची तारीख अखेर केंद्र सरकारने निश्चित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः एका विशेष कार्यक्रमात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करणार आहेत.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या देशभरातील पात्र शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची लाट आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ मार्च २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाम दौऱ्यावर असताना, तेथून एका भव्य कार्यक्रमात देशभरातील ९ कोटींहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (DBT) २,००० रुपयांची सन्मान राशी जमा करणार आहेत. यापूर्वीचा २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आला होता. आता या नवीन हप्त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आणि त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे.
तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? तपासा 'बेनेफिशियरी स्टेटस'
जर तुम्हाला खात्री करायची असेल की हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल की नाही, तर सोप्या स्टेप्स फॉलो करा.
- १. सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
- २. होमपेजवर "Know Your Status" (तुमची स्थिती जाणून घ्या) या पर्यायावर क्लिक करा.
- ३. तुमचा नोंदणी क्रमांक (Registration Number) आणि कॅप्चा कोड टाका.
- ४. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी (OTP) भरा.
- ५. 'Get Data' वर क्लिक करताच, तुमच्या खात्याची आणि हप्त्याची सविस्तर माहिती स्क्रीनवर दिसेल.
गावच्या यादीत तुमचे नाव कसे पाहायचे?
तुमच्या गावच्या लाभार्थी यादीत तुमचे नाव आहे की नाही, हे पाहण्यासाठी काही प्रक्रीया तुम्हाला करावी लागेल ती समजून घेऊया.
- १. अधिकृत वेबसाइटवर "Beneficiary List" (लाभार्थी यादी) हा पर्याय निवडा.
- २. तुमचे राज्य, जिल्हा, उप-जिल्हा, ब्लॉक आणि गाव यासारखे तपशील भरा.
- ३. 'Get Report' वर क्लिक करा. तुमच्या गावांतील सर्व लाभार्थ्यांची यादी स्क्रीनवर येईल, जिथे तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.
'या' शेतकऱ्यांचा हप्ता अटकू शकतो!
योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकार सातत्याने लाभार्थ्यांच्या डेटाची पडताळणी करत आहे. ज्या शेतकऱ्यांनी खालील गोष्टी पूर्ण केल्या नाहीत, त्यांचा हप्ता अटकण्याची शक्यता आहे.
ई-केवायसी (e-KYC): जर तुम्ही अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर ती त्वरित पूर्ण करा.
आधार लिंकिंग: बँक खाते आधारशी लिंक असणे अनिवार्य आहे.
जमीन रेकॉर्ड: अर्जामध्ये जमिनीशी संबंधित रेकॉर्डची पडताळणी आवश्यक आहे.
अपात्रता: आयकर भरणारे, सरकारी नोकरी करणारे किंवा अपात्र आढळलेल्या लाभार्थ्यांना यादीतून हटवण्यात आले आहे.












Click it and Unblock the Notifications