PM Kisan Update : खूशखबर! पीएम किसानचे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 'या' तारखेला पडणार 2 हजार रुपये
PM Kisan 22nd Installment : देशातील कोट्यवधी अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आधारवड ठरलेल्या 'पंतप्रधान किसान सन्मान निधी' (PM Kisan Yojana) योजनेच्या २२ व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपणार आहे. होळीच्या सणापूर्वी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २,००० रुपयांचा हप्ता जमा करण्याची शक्यता आहे. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात बळीराजाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

मार्चच्या सुरुवातीला पैसे मिळण्याची शक्यता
मीडिया रिपोर्ट्सनुसार, २२ व्या हप्त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मार्च २०२६ च्या पहिल्या आठवड्यात किंवा होळीपूर्वी हा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे वर्ग केला जाऊ शकतो. वर्षाकाठी मिळणाऱ्या ६,००० रुपयांपैकी हा वर्षातील पहिला हप्ता असेल. मात्र, अद्याप सरकारने तारखेबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.
अडकलेले ४,००० रुपये एकत्र मिळणार?
ज्या शेतकऱ्यांचा २१ वा हप्ता काही तांत्रिक कारणांमुळे किंवा कागदपत्रांच्या त्रुटीमुळे अडकला होता, त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. जर अशा शेतकऱ्यांनी आता आपली कागदपत्रे आणि ई-केवाईसी (e-KYC) पूर्ण केली असेल, तर त्यांना जुने २,००० आणि नवीन २,००० असे मिळून एकूण ४,००० रुपये एकत्र मिळण्याची शक्यता आहे.
'या' ३ गोष्टी पूर्ण नसल्यास हप्ता रखडणार!
योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सरकारने काही अटी कडक केल्या आहेत.
१. ई-केवाईसी (e-KYC): पीएम किसान पोर्टलवर जाऊन ई-केवाईसी करणे अनिवार्य आहे.
२. आधार लिंकिंग: तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
३. भूलेख अंकन (Land Seeding): तुमच्या जमिनीची नोंदणी पीएम किसान पोर्टलवर अधिकृतपणे झालेली असावी.
हप्त्याचे स्टेटस असे तपासा
- पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर (pmkisan.gov.in) जा.
- 'Know Your Status' या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाकून कॅप्चा भरा.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या हप्त्याची सद्यस्थिती स्क्रीनवर दिसेल.












Click it and Unblock the Notifications