PM Kisan :शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी 'डबल' भेट! खात्यात PM किसानचा 2 हजारांचा हप्ता 'या' दिवशी येणार
PM Kisan 21st Installment Update in marathi : देशभरातील कोट्यवधी शेतकरी सध्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Yojana) २१ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. शेतकऱ्यांसाठी ही केवळ २००० रुपयांची आर्थिक मदत नसून, त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी मोठा आधार आहे.

कधी मिळणार पीएम किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता
माध्यमांच्या वृत्तानुसार, केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता दिवाळीपूर्वी म्हणजेच ऑक्टोबर २०२५ च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्याचे संकेत दिले आहेत. निश्चित तारखा अद्याप जाहीर होणे बाकी असून त्या लवकरच जाहीर होतील असे सुत्रांनी सांगितले. तुमच्या खात्यात ही रक्कम वेळेवर जमा होण्यासाठी ई-केवायसी (e-KYC), बँक खात्याची जोडणी आणि जमिनीच्या नोंदीची पडताळणी ही अत्यंत महत्त्वाची कामे त्वरित पूर्ण करणे आवश्यक आहे. जर तुम्ही हे कामं वेळेवर केले नाहीतर तुमचा पुढचा हप्ता अडकू शकतो.
या शेतकऱ्यांचे पैसे झाले जमा
नुकत्याच झालेल्या पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान लक्षात घेऊन केंद्र सरकारने काही राज्यांतील शेतकऱ्यांसाठी त्वरित दिलासा म्हणून २१ वा हप्ता आधीच पाठवला आहे. यामध्ये लाभ मिळालेले राज्यांमध्ये पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरचा समावेश आहे. या चार राज्यांमधील सुमारे ३६ लाख शेतकऱ्यांना ही रक्कम आगाऊ स्वरूपात मिळाली आहे.
तुमचा हप्ता का अडकू शकतो? त्वरित करा 'हे' काम
जर तुम्ही देशातील उर्वरित राज्यांमध्ये येत असाल आणि दिवाळीपूर्वी तुमच्या खात्यात पैसे जमा व्हावे असे वाटत असेल, तर खालील चार अत्यंत महत्त्वाची कामे त्वरित पूर्ण करा. अन्यथा तुमचा हप्ता अडकण्याची शक्यता आहे:
अडथळा दुर करण्यासाठी उपाय
१. ई-केवायसी (e-KYC) अपूर्ण ज्या शेतकऱ्यांनी आपली e-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना पैसे मिळणार नाहीत. ही प्रक्रिया ऑनलाईन OTP द्वारे किंवा जवळच्या CSC सेंटरवर बायोमेट्रिक पद्धतीने पूर्ण करा.
२. बँक खाते त्रुटी तुमचे बँक खाते आधारशी जोडलेले नसेल IFSC कोड चुकीचा असेल किंवा खाते बंद झाले असेल, तर व्यवहार अपयशी होईल. बँक डिटेल्स त्वरित तपासा आणि अपडेट करा.
३. जमिनीच्या नोंदीची पडताळणी तुमच्या जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी पोर्टलवर योग्यरित्या पूर्ण न झाल्यास किस्त रोखली जाऊ शकते.
४. फार्मर रजिस्ट्री आवश्यक आता फक्त पीएम किसान पोर्टलवर नोंदणी पुरेशी नाही. राज्य सरकारच्या फार्मर रजिस्ट्रीमध्ये तुमचे नाव नोंदवणे अनिवार्य आहे. हे काम CSC सेंटरवर किंवा राज्याच्या ॲपद्वारे (उदा. 'Farmer Registry UP App') करता येते.












Click it and Unblock the Notifications