Fact Check : 'शस्त्रे खरेदी करायचे, प्रत्येकाने 1 रुपया दान करा', व्हायरल संदेशाचे नेमकं सत्य काय?
pahalgam terrorist attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती आहे. दोन्ही देश एकमेकांवर कडक निर्बंध लावत आहेत, तर येत्या काळात मोठे युद्ध होणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, अशातच व्हॉट्सअपवर एक मेसेज व्हायरल होत आहे. या संदेशात असा दावा केला जात आहे की, सरकारने भारतीय सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी व नवीन शस्त्रे खरेदी करण्यासाठी बँक खाते उघडले आहे.
त्यात देशातील प्रत्येकाने 1 रुपयापासून मदत देण्यास सुरूवात करावी, परंतु, हा मेसेज खरचं अधिकृत आहे का?, यासाठी आम्ही सत्य परिस्थिती चेक केली असता हा मेसेज बनावट असल्याचे समोर आले आहे. शासनाच्या वतीने असा कोणताही दावा करण्यात आलेला नाही, हे उघडकीस आले. पीआयबी फॅक्ट चेकने देखील तसा दावा केला आहे.

व्हायरल संदेशात नेमका काय करण्यात आला दावा
देशभरात एकीकडे भारत पाकिस्तान तणावाच्या चर्चा आहेत. पहलगाम हल्ल्याचा निषेध करून आतंकवाद्यांचा खात्मा केला गेला पाहिजे, अशी मागणी आता जोर धरून आहे. तर दुसरीकडे, देशभरातील नागरिकांच्या व्हाट्सअपवर संदेश येऊ लागले आहे की, मोदी सरकारने भारतीय सैन्याचे आधुनिकीकरण करण्याचे निश्चित केले आहे. युद्धभूमीवर जखमी किंवा शहीद झालेल्या सैनिकांसाठी बँक खाते उघडले आहे. प्रत्येक भारतीय त्यांच्या इच्छेनुसार, या खात्यात कोणतीही रक्कम दान करू शकतो असेही त्यात म्हटले आहे. ते 1 रुपयांपासून देखील मदत करायला सुरूवात करू शकतात. व्हायरल संदेशात असाही दावा करण्यात आला की, हे पैसे शस्त्रे आणि लष्करी उपकरणे खरेदी करण्यासाठी वापरले जातील. यामध्ये लोकांना या मोहिमेत सामील होऊन लष्कराला थेट मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
A WhatsApp message is going around claiming that government has opened a bank account for the modernization of the Indian Army.#PIBFactCheck
— PIB Fact Check (@PIBFactCheck) April 27, 2025
❌ This claim is MISLEADING
❌The bank account mentioned in the message is NOT meant for modernization of Indian Army or for purchase… pic.twitter.com/flm2vGe22G
PIBFactCheck ने दावा फेटाळून लावला
दरम्यान, PIBFactCheck ने हा दावा खोटा असल्याचे घोषित केले आहे. संदेशात दिलेले बँक खाते सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी किंवा शस्त्रास्त्रे खरेदीसाठी वापरले जात नाही. हा दिशाभूल करणारा मेसेज आहे, असा दावा पीआयबी फॅक्ट चेकने दावा केला.
व्हायरल मेसेजमध्ये या अकाऊंटचा समावेश
सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणाऱ्या एका मेसेजमध्ये, बँक खाते क्रमांक- 90552010165915 असा उल्लेख करण्यात आला आहे आणि नागरिकांना त्या खात्यात देणगी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जरी ते दररोज फक्त एक रुपया असले तरी, जेणेकरून सैन्यासाठी नवीन शस्त्रे खरेदी करता येतील.
1 रुपया दान करून 30 दिवसांत 36000 कोटी
संदेशात असा दावा करण्यात आला आहे की, सुपरस्टार अक्षय कुमारच्या सूचनेवरून मोदी सरकारने भारतीय सैन्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जर 70% भारतीय लोकसंख्येने या निधीत दररोज फक्त 1 रुपये दान केले तर 30 दिवसांत 36,000 कोटी रुपये आणि वर्षाला 4 लाख 36 हजार कोटी रुपये जमा होऊ शकतात. पाकिस्तानच्या संरक्षण बजेटशी तुलना केल्यास असे म्हटले जाते की ते त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असेल आणि भारत निश्चितच महासत्ता बनेल.
आर्मीने 2022 मध्ये उचलले हे महत्त्वाचे पाऊल
२०२२ मध्ये, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतमातेच्या सुपुत्रासाठी www.maabharatikesapoot.mod.gov.in ही वेबसाइट सुरू केली. पीआयबी फॅक्ट चेकनुसार, नागरिकांनी अशा दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहिले पाहिजे. कोणत्याही खात्यात देणगी देण्यापूर्वी, विशेषतः जेव्हा सैन्य किंवा सरकारी योजनांचे नाव गुंतलेले असेल, तेव्हा माहितीची सत्यता नक्कीच पडताळून पहा.
-
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
Epfo pension : 20 दिवस उलटूनही पेन्शन क्लेम होतोय रिजेक्ट? ही आहेत कारणे; वाचा ईपीएफओचा नवा नियम -
LPG Cylinder New Rule: गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये बदल; ग्रामीण भागात आता 'इतक्या' दिवसांनी होणार बुकिंग -
Gold Price Forecast: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! 1 तोळा सोनं 2 लाखांचा टप्पा ओलांडणार? वाचा अंदाज -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस -
मनोरंजन विश्वावर शोककळा! अवघ्या 27व्या वर्षी प्रसिद्ध कलाकाराचा संशयास्पद मृत्यू -
PM Kisan 22nd Installment आज कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2 हजार रुपये; वेळ आणि स्टेटस तपासा -
Horoscope Today March 12, 2026 Marathi : गुरुवार ठरणार प्रगतीचा दिवस; वाचा तुमच्या राशीत काय आहे खास -
IPL 2026 Schedule: आयपीएलचे 15 दिवसांचे वेळापत्रक समजून घ्या; पहिल्या सामना RCB Vs हैदराबाद









Click it and Unblock the Notifications