Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पाटणा एअरपोर्टवर थरार; इंडिगोचे विमान लॅंडिंग होताच पुन्हा हवेत अन् टळला मोठा अपघात, नेमकं काय घडलं!

Runway Scare in Patna : दिल्लीहून पाटणा विमानतळावर येणाऱ्या इंडिगोच्या 6ई2482 विमानातील सुमारे 173 प्रवाशांनी अक्षरशः जीव मुठीत धरला होता. लँडिंगनंतरही धावपट्टी लहान असल्याच्या भीतीने पायलटने विमान पुन्हा वर उचलले आणि तीन-चार फेऱ्या मारल्यानंतरच ते पुन्हा सुरक्षितपणे उतरले. या 5 मिनिटांच्या थराराने विमानात एकच घबराट पसरली होती. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि.16 जुलै) घडला.

ही घटना आता समोर आली आहे. तर या घटनेने पाटणा विमानतळाच्या धावपट्टीच्या लांबीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी धावपट्टीचा विस्तार करणे किती महत्त्वाचे आहे हे या घटनेतून स्पष्टपणे दिसून येत आहे.

पायलटने का उचलले विमान पुन्हा वर?

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री 9 वाजता दिल्लीहून पाटणा येथे पोहोचल्यानंतर पायलटने विमान उतरवण्यास सुरुवात केली. मात्र, विमान स्पर्शबिंदूपेक्षा थोडे पुढे गेले होते. पाटणा विमानतळाची धावपट्टी तुलनेने लहान असल्यामुळे, पायलटने धावपट्टीवर विमान थांबवता येणार नाही असे वाटल्याने तातडीने विमान पुन्हा हवेत उचलण्याचा निर्णय घेतला. पायलटने विमान पुन्हा वर उचलल्याचे पाहून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या 5 मिनिटांच्या कालावधीत सर्व प्रवाशांचा श्वास जणू काही थांबला होता. अखेर, विमान पुन्हा सुरक्षितपणे उतरल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Patna Airport

कर्मचाऱ्यांनी परिस्थिती कशी हाताळली?

सध्या घडत असलेल्या विमान अपघातांच्या घटना पाहता, प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट पसरली होती. धावपट्टीवर काहीतरी अडचण असावी किंवा कोणतीतरी आपत्कालीन परिस्थिती असावी असे प्रवाशांना वाटले.

मात्र, विमानाच्या क्रू मेंबर्सनी प्रसंगावधान राखत परिस्थिती अत्यंत चांगल्या प्रकारे हाताळली. त्यांनी प्रवाशांना कोणतीही आपत्कालीन परिस्थिती नसल्याचे सांगितले. तसेच, तांत्रिक कारणांमुळे विमान पुन्हा उतरवण्यात येत असून, चार-पाच मिनिटांत लँडिंग होईल, त्यामुळे धीर धरावा असे आवाहन त्यांनी केले.

पाटणा विमानतळाच्या धावपट्टीची नेमकी स्थिती काय?

पाटणा विमानतळाच्या धावपट्टीची सध्याची लांबी २,०७२.६४ मीटर आहे. मात्र, ती ५८४.९६ मीटरने वाढवून २,६५७.६ मीटर (चुकीने आधी ३६५७.६ लिहिले गेले होते) करण्याची तयारी वेगाने सुरू आहे. अहमदाबाद येथील विमान अपघातानंतर केंद्र सरकारने देशभरातील सर्व विमानतळांच्या सुरक्षिततेबाबत एक एडवायझरी जारी केली आहे, ज्यामध्ये धावपट्टीची लांबी आणि सुरक्षिततेबाबत विशेष मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर हे काम वेगाने सुरू आहे.

धावपट्टी वाढवण्याची गरज का आहे?

दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, पाटणा विमानतळाचे एक संचालक अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाटणा विमानतळाच्या धावपट्टीची लांबी किमान २४३८ मीटर असावी. सध्या ती फक्त २०७२ मीटर आहे. कमी लांबीमुळे, विमाने ३ अंशांच्या कोनावर उतरतात, तर ती २.५ अंशांच्या कोनावर उतरणे अधिक सुरक्षित मानले जाते. एका विमान अभियंत्याच्या मते, मोठ्या विमानांच्या लँडिंगसाठी किमान ३-५ किलोमीटर लांबीची धावपट्टी आवश्यक असते, तर पाटणाची धावपट्टी दोन किलोमीटरपेक्षा थोडी जास्त आहे.

खराब हवामानात लहान धावपट्टीवर उतरणे सुरक्षित आहे का?

विमान चालविणाऱ्या तज्ञांच्या मते, पाटणा विमानतळाची लहान धावपट्टी असल्यामुळे पावसाळ्यात आणि थंडीच्या काळात वैमानिकांना विमाने उडवताना आणि उतरवताना अनेक अडचणी येतात. विशेषतः दोन प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो:

कमी दृश्यमानता

जेव्हा दृश्यमानता कमी असते, तेव्हा उड्डाण आणि लँडिंगमध्ये समस्या येते. अशा परिस्थितीत लांब धावपट्टी असणे अधिक फायदेशीर ठरते.

जोराचे वारे

जेव्हा जोरदार वारे वाहतात, तेव्हा लँडिंगमध्ये समस्या निर्माण होते. अशा वेळी हवेचा दाब कमी करण्यासाठी विमानाला अधिक वळवावे लागते. या परिस्थितीत मोठी धावपट्टी असणे अधिक महत्त्वाचे ठरते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+