Parshuram Jayanti 2025 : भगवान परशुराम जयंतीनिमत्त आपल्या प्रियजनांना पाठवा खास मराठी शुभेच्छा संदेश
Parshuram Jayanti 2025 Wishes in Marathi: परशुराम जयंती ही वैशाख मासातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला साजरी केली जाते. यावर्षी परशुराम जयंती 29 एप्रिल 2025 रोजी येत आहे. परशुराम हे भगवान विष्णूंचे सहावे अवतार मानले जातात आणि या दिवशी त्यांच्या जन्माचा उत्सव साजरा केला जातो. परशुराम जयंती हा अक्षय तृतीया या सणासोबतच साजरा होतो, ज्यामुळे या दिवसाचे धार्मिक महत्त्व अधिकच वाढते.
हिंदू पंचांगानुसार, वैशाख मासातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला परशुराम जयंती साजरी केली जाते. या वर्षी ही तिथी 29 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 5:32 वाजता सुरू होईल आणि 30 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2:11 वाजता समाप्त होईल. परशुरामांचा जन्म प्रदोष काळात झाला होता. म्हणजेच संध्याकाळच्या वेळी, त्यामुळे 29 एप्रिल हा दिवस परशुराम जयंतीसाठी योग्य मानला गेला आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग यांचा शुभ संयोग जुळून येत आहे, ज्यामुळे पूजा आणि धार्मिक विधींसाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जातो.या परशुराम जयंतीनिमित्त आपण आपल्या प्रियजनांना शुभेच्छा संदेश पाठवून शुभेच्छा देऊ शकता.

भगवान परशुराम जयंती निमित्त खास शुभेच्छा संदेश
भगवान परशुरामांच्या आशीर्वादाने
तुमच्या जीवनात शांती,आनंद आणि समृद्धी येवो.
परशुराम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
शस्त्र आणि शास्त्रं दोन्ही आहेत उपयोगी
हा धडा शिकवला ज्याने तो आहे महायोगी
जय श्री परशुराम,जय जय श्री परशुराम
परशुराम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्व मिळून परशुराम जयंती साजरी करूया
परमेश्वराचे नाव घेऊन आणि त्याची स्तुती करूया
मागू आशीर्वाद करून त्यांचे नामस्मरण
जय परशुराम,जय परशुराम,जय परशुराम
परशुराम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
शांत आहे तर तो श्रीराम आहे
संतापला तर तो परशुराम आहे
जय श्री राम,जय श्री परशुराम
भगवान परशुराम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
परशुराम प्रतिक आहे प्रेमाचे,
परशुराम प्रतिक आहे सत्य सनातनचे,
म्हणूनच परशुरामचा अर्थ आहे,
पराक्रमाचे कारक आणि सत्याचे धारक
परशुराम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरु आहेत ते महारथी करणाचे
जानतात अंतर अनंत आणि मृत्यूचे
सर्व जग करते ज्यांची पूजा
पाणीही बनते अमृत पदस्पर्शाने त्यांच्या
भगवान परशुराम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
ब्राह्मण बदलले की परिणाम बदलतात
सर्व प्रसंग,सर्व परिणाम बदलतात
कोण म्हणतं परशुराम पुन्हा जन्म घेत नाहीत?
जन्माला तर येतात,फक्त नावे बदलतात
परशुराम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
या शुभदिनी भगवान परशुराम तुम्हाला
शक्ती,धैर्य आणि बुद्धीचा आशीर्वाद देवो
परशुराम जयंतीच्या शुभेच्छा!
तुम्हाला आनंद,शांती आणि समृद्धीने
भरलेल्या परशुराम जयंतीच्या शुभेच्छा
भगवान परशुरामांचे आशीर्वाद
तुमच्यासोबत नेहमीच राहोत.
परशुराम जयंतीच्या या पवित्र प्रसंगी
तुम्हाला आनंद,यश आणि चांगले आरोग्य लाभो
परशुराम जयंतीच्या शुभेच्छा!
परशुराम जयंतीच्या शुभ प्रसंगी
मी तुमच्या आनंद
समृद्धी आणि कल्याणासाठी
प्रार्थना करतो भगवान परशुराम
तुम्हाला भरपूर आशीर्वाद देवोत.
तुम्हाला आणि तुमच्या
कुटुंबाला परशुराम जयंतीच्या
आनंददायी आणि भरभराटीच्या शुभेच्छा
भगवान परशुरामांचे आशीर्वाद
तुमच्यासोबत नेहमीच राहोत.
या शुभदिनी,भगवान परशुराम
तुम्हाला कठीण प्रसंगावर
मात करण्यासाठी आणि
तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये
यश मिळविण्यासाठी शक्ती देवो.
परशुराम जयंतीच्या शुभेच्छा!
तुम्हाला परशुराम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
हा शुभ दिवस तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये आनंद
समृद्धी आणि यश घेऊन येवो.
भगवान परशुरामांचे आशीर्वाद
आज आणि नेहमीच
तुमच्यासोबत राहोत
परशुराम जयंतीच्या शुभेच्छा!
परशुराम जयंतीच्या शुभेच्छा
हा शुभ दिवस तुम्हाला शांती
आनंद आणि समृद्धी घेऊन येवो.
या शुभ दिवशी भगवान परशुराम
तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर
त्यांचे आशीर्वाद वर्षाव करोत
तुमचे जीवन प्रेम,आनंद आणि समृद्धीने भरो
परशुराम जयंतीच्या शुभेच्छा!












Click it and Unblock the Notifications