Papmochini ekadashi 2025 : आज पापमोचिनी एकादशी, पूजेची पद्धत, पारण वेळ आणि जाणून घ्या काय आहे महत्व
Papmochini ekadashi 2025 : चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला पापमोचिनी एकादशी म्हणतात. या एकादशीच्या नावावरूनच पापाचे मोचन होते हे लक्षात येते. ही एकादशी माणसाला नकळत केलेल्या पापांपासून मुक्त करून सुख, समृद्धी आणि सर्व प्रकारचे आनंद प्रदान करते. मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो.
या दिवशी भगवान विष्णूची पिवळ्या फुलांनी आकर्षक सजावट करून पूजा केली जाते. ही एकादशी भगवान विष्णूला अत्यंत प्रिय असल्याने ते भक्तांना सहज अनेक सुख प्रदान करतात. या एकादशीच्या दिवशी केवळ पापांचा नाश होत नाही, तर या दिवशी काही विशेष कार्य केल्याने भगवान विष्णू सुख-समृद्धीसोबतच अविवाहित मुला-मुलींना वैवाहिक सुखही प्रदान करतात.

भगवान विष्णूला काय अर्पण करावे (papmochani Ekadashi 2025)
पापमोचिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला पिवळे फुले अर्पण करावीत. त्यांना पिवळ्या फुलांनी सजवा. या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूचे रूप असलेल्या पीपळाच्या झाडाची पूजा करावी. शक्य असल्यास, कोणत्याही विष्णू मंदिरात किंवा त्यांचे अवतार श्री राम मंदिर, कृष्ण मंदिरात जावे. भगवान दत्तात्रेयांचेही दर्शन घेतले पाहिजे.
लग्न करणाऱ्यांसाठी खास गोष्टी
- ज्या तरुण-तरुणींना लग्न करता येत नाही. त्यांनी या एकादशीचे व्रत पूर्ण भक्तिभावाने पाळावे.
- पाण्यात चिमूटभर हळद टाकून आंघोळ करावी. त्यानंतर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून दिवसभर पूजा करून व्रत ठेवावे.
- गुरु ग्रहाच्या शांतीसाठी या दिवशी पुष्कराज सोन्याच्या अंगठीत धारण करावा.
- पुष्कराजऐवजी सोनेही घालता येते.
नऊ ग्रहांचा त्रास असेल तर या गोष्टी करा
चार ग्रहांपेक्षा जास्त त्रास होत असल्यास या एकादशीच्या दिवशी सकाळी पाण्यात नवग्रहशांती औषध टाकून स्नान करावे आणि विष्णु सहस्रनामाचे पठण करावे. यामुळे ग्रह शांत होतील. पापमोचिनी एकादशीच्या दिवशी भगवान दत्तात्रेयांची पूजा करून त्यांचे दर्शन केल्याने सर्व सुखांची प्राप्ती होते. या एकादशीला भगवान विष्णूला पिवळे फळ अर्पण करावे.
एकादशी कधी आहे, वेळ काय?
एकादशी तिथीची सुरुवात : 25 मार्च सकाळी 5:05 वाजेपासून
एकादशी तिथी पूर्ण: 26 मार्च 3:45 दुपारी पर्यंत
एकादशीची समाप्ती: 26 मार्च दुपारी 1:46 ते सायंकाळी 4:13












Click it and Unblock the Notifications