पॅन- आधार लिंकींगबाबत नवा आदेश; कुणासाठी आहे आदेश? काय आहे आदेशात? काय करावे लागेल? वाचा डिटेल्स

केंद्र सरकारने आधार कार्ड व पॅन कार्डच्या लिंकिंगबाबत एक नवीन अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ज्या लोकांनी आधार क्रमांक पॅनकार्डला लिंक केलेले नाहीत, त्यांना नवीन मुदत देण्यात आली आहे. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत हे काम करता येणार आहे.

PAN Card- Aadhaar Card Linking Update

काय आहे अधिसूचना?

सरकारने काढलेल्या अधिसूचनेत असे सांगण्यात आले आहे की, ज्या पॅनधारकांनी १ ऑक्टोबर २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी आधार नोंदणी आयडी वापरून पॅन मिळवला आहे, त्यांनी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत त्यांच्या आधार क्रमांकाची माहिती आयकर विभागाला देणे आवश्यक आहे. पॅनधारकाची अचूक आणि अद्ययावत माहिती आयकर विभागाच्या नोंदींमध्ये राहावी यासाठी हे आवश्यक आहे. ही अधिसूचना अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) प्रसिद्ध केली आहे.

कुणासाठी आहे आदेश?

हा नवीन आदेश अशा पॅनधारकांसाठी आहे ज्यांनी आधार क्रमांकाऐवजी आधार नोंदणी आयडीद्वारे पॅन क्रमांक मिळवला आहे. ज्यावेळी आधार क्रमांक आले नव्हते त्यावेळी फक्त आधार नोंदणी क्रमांकावर काहींनी पॅनकार्ड काढले आहेत. त्यामुळे अनेकांचे आधार क्रमांकाऐवजी आधार नोंदणी क्रमांक पॅनशी जोडलेले आहेत. आता अशा लोकांना यांच्या आधार क्रमांकाची माहिती आयकर विभागाला द्यावी लागणार आहे. म्हणजेच पॅन आणि आधार क्रमांक लिंक करावा लागणार आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी त्यांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. ज्या लोकांना आयकर रिटर्न भरायचे आहेत, त्यांनी हे काम ३१ जुलैपूर्वी पूर्ण करावे, अन्यथा त्यांना आयकर रिटर्न भरण्यात अडचणी येतील असेही सांगण्यात आले आहे.

कसे करायचे अपडेट?

सीबीडीटीच्या या नवीन अधिसूचनेत पॅनधारकांना त्यांच्या आधार क्रमांकाची माहिती आयकर विभागाला देण्यासाठी काय करावे लागेल हे सांगण्यात आलेले नाही. परंतु यासाठी त्यांना पॅन-आधार लिंकिंगसाठी वापरली जाणारी प्रक्रियाच वापरावी लागेल. म्हणजेच त्यांना ई-फायलिंग पोर्टलवर जाऊन त्यांचे पॅन आणि आधार तपशील अपडेट करावे लागतील. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीच्या आधारे, असे गृहीत धरले जाऊ शकते की यासाठी त्यांना कोणताही दंड भरावा लागणार नाही.

मुदतीनंतर काय होईल?

पॅन धारकांना त्यांचा आधार क्रमांक ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत प्राप्तिकर विभागाला द्यावा लागेल. परंतु जर कोणी या अंतिम मुदतीत हे केले नाही तर त्याचे काय परिणाम होतील हे स्पष्ट नाही. परंतु असे न केल्यास ते पॅन कार्ड १ जानेवारी २०२६ पासून निष्क्रिय केले जाऊ शकते. असे झाल्यास, पॅन कार्ड आर्थिक व्यवहार आणि आयकर संबंधित कामांमध्ये वापरता येणार नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+