Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

PAK डॉनची लॉरेन्स बिश्नोईला धमकी, म्हणाला- बाबा सिद्दीकी आणि सिद्धू मुसेवाला हत्येचे गुपित उघड करेल

Pakistani Don Shahzad Bhatti Vs Lawrence Bishnoi : पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यात लोकांची हत्या ही धर्म विचारून करण्यात आली. त्यानंतर या हल्ल्याचा बदला घेतला जाईल, अशी धमकी लॉरेन्स बिश्नोई गॅंगकडून देण्यात आली आहे. गुजरातमधील साबरमती तुरुंगात बंद असलेल्या कुख्यात गँगस्टर लॉरेन्सच्या धमकीची देखील चर्चा होऊ लागली. अशातच, पाकिस्तानी डॉन शहजाद भट्टी आता लॉरेन्सवर आक्रमक झाला आहे.

काय म्हणाला पाकिस्तानी डॉन शहजाद भट्टी?

पाकिस्तानातील गुंड शहजाद भट्टी आणि लॉरेन्स बिश्नोईची मैत्री असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी दोघांच्या संवादाचे व्हिडिओ देखील समोर आले होते. अशातच, लॉरेन्सने पाकिस्तानविरोधात दिलेल्या धमकीमुळे गुंड शहजाद भट्टी लॉरेन्सवर संतापला आहे. तो म्हणाला की, पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या मुंबईत झालेल्या हत्येमागील गुपिते मी उघड करेन. आता आपल्यातली मैत्री संपली आहे. जर हा विषय देशाचा असेल तर आता आम्ही देखील गप्प बसणार नाही. पाकिस्तानी डॉन शहजाद भट्टीने एक व्हिडिओ जारी केला आहे ज्यामध्ये त्याने यावर भाष्य केले आहे. काही दिवसांपूर्वी लॉरेन्स टोळीकडून आलेल्या धमकीनंतर त्याने हा व्हिडिओ जाणीवपूर्वक जारी केला.

Shahzad Bhatti Vs Lawrence Bishnoi

लॉरेन्स गॅंगकडून पाकला दिली होती धमकी?

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, लॉरेन्स ग्रुपने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईदच्या फोटोवर क्रॉस लावण्यात आला होता. आणि त्यात लिहिले होते की, 'लवकरच बदला घेऊ'.

लॉरेन्स गँगने पोस्टमध्ये लिहिले होते - काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात घडलेल्या सर्व भावांना राम-राम. निष्पाप लोकांना कोणतीही चूक नसताना मारण्यात आले आहे, आम्ही लवकरच याचा बदला घेऊ. त्यांनी आमच्या पुरुषांना मारले आहे. आम्ही त्यांना कायदेशीररित्या मारू.

आम्ही पाकिस्तानात घुसू आणि विटीचे उत्तर दगडाने देऊ. आम्ही पाकिस्तानात घुसू आणि फक्त एका व्यक्तीला मारू, जे 1 लाख लोकांना मारण्या इतके असेल. जर तुम्ही हस्तांदोलन केले तर आम्ही तुम्हाला मिठी मारू; जर तुम्ही आमचा अवमान केला तर आम्ही तुमचे डोळे काढून टाकू; आणि जर तुम्ही असे घृणास्पद कृत्य केले तर आम्ही पाकिस्तानात घुसून तुमच्याच भाषेत उत्तर देऊ, असा इशारा देण्यात आला होता.

पाकिस्तानी डॉनने जारी केलेल्या व्हिडिओत नेमकं काय?

लॉरेन्स गॅंगच्या धमकी नंतर आता पाकिस्तानी डॉनने जारी केलेल्या व्हिडिओत लॉरेन्सह संपूर्ण गॅंगला धमकी दिली. त्यात त्याने मोठे खुलासे देखील केले. व्हिडिओमध्ये भट्टी म्हणाला. "माझा हा व्हिडिओ लॉरेन्ससाठी आहे, ज्याने म्हटले आहे की तो पाकिस्तानात घुसून एक लाख मुस्लिमांना मारेल. मी त्याला सांगू इच्छितो की पाकिस्तान खूप दूर आहे, तुम्ही देशात पक्षीही मारू शकत नाही. मी तुला खूप चांगले ओळखतो आणि तू मलाही ओळखतोस, माझी सिस्टम काय आहे अन् मी काय करू शकतो.

तो म्हणाला- मी हे सर्व व्हिडिओ आणि ऑडिओ सर्व पुराव्यांसह माध्यमांसमोर सादर करेन. तसेच, बाबा सिद्दीकीला मारण्यासाठी कोणत्या राजकारण्याने झीशानला पैसे दिले याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. हत्येच्या वेळी झीशानसोबत कॉलवर कोण उपस्थित होते, याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. ही हत्या कोणाच्या इशाऱ्यावर झाली, माझ्याकडे सर्व पुरावे आहेत.

मूसेवालाच्या हत्येचे सर्व रेकॉर्डही उपलब्ध

भट्टी व्हिडिओत पुढे म्हणतो की, सिद्धू मूसेवाला या गायकास कोणी मारले? शस्त्रांचा खर्च कोणी केला? शस्त्रे कुठून आली? भारतीय रुपये कोणी दिले आणि कुठे काय झाले? माझ्याकडे सर्व रेकॉर्ड आहेत. जर माझ्या देशाचा विषय पुन्हा आला तर सगळं बाहेर काढलं जाईल, हे लॉरेन्सने लक्षात घेतलं पाहिजे.

पोस्ट टाकून कधीही डॉन बनलो नाही

तो म्हणाला- जेव्हा माझे तुमच्याशी नाते होते तेव्हाही मी तुमच्यापेक्षा मोठा होतो आणि आजही मी तुमच्यापेक्षा मोठा आहे. मी कधीही खोट्या पोस्ट टाकून डॉन झालो नाही किंवा कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीला लक्ष्य करून प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न केला नाही. मी जे काही काम केले आहे ते मी स्वतःच्या हातांनी केले आहे. म्हणून, माझ्या देशाबद्दल, देशातील कोणत्याही संस्थेबद्दल किंवा कोणत्याही मुस्लिमांबद्दल काहीही बोलण्यापूर्वी तू विचार केला पाहिजे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+