Big News : पहलगाम हल्ल्यानंतर 'आक्रमण!' भारतीय वायूसेनेचा युद्धाभ्यास सुरु! काय होतेय तयारी? वाचा
Pahalgam Terrorist attack Indian Air Forces Aakrman war exercise : जम्मू - काश्मीर येथील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भीषण हत्याकांडानंतर आता केंद्र सरकारने कडक पाऊले उचलली आहे. या धर्तीवर भारताने पाकिस्तानची कोंडी करण्याची तयारी सुरु केली आहे. तर दुसरीकडे वायूसेनेने 'आक्रमण' नावाने युद्धाभ्यास सुरु केला आहे.
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करत 26 भारतीय नागरिकांचे जीव घेतले अत्यंत अमानुषपणे केलेल्या या कृत्याची जगात निंदा होत आहे. अशातच भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधु जलकरार स्थगित केला आहे आणि त्यासोबतच व्हिजावर असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात 48 तासात परत जाण्याचे निर्देश दिले आहेत. भारताने उचलेल्या कडक पावलांमुळे पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे.

याला प्रत्युत्तर म्हणून पाकीस्तानने शिमला करार मोडण्याची धमकी दिली आहे तसेच पाकिस्तानकडूनही मिसाईलची चाचणी घेतली जात आहे. या सर्व गोष्टींमुळे आता दोन्ही देशांचे संबंध अधिकच तणावपूर्ण झाले आहेत. दरम्यान भारताकडूनही सेंट्रल सेक्टरमध्ये आक्रमण या नावाने वायूसेनेचा युद्धाभ्यास सुरू आहे.
यासंदर्भात अमर उजालाने सुरक्षा सुत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. या यु्द्धाभ्यासात राफेल आणि सुखोई-30 या विमानांचा समावेश आहे. राफेल हरियानातील अंबाला आणि पश्चिम बंगालमधील हाशिमारा येथे तैनात आहेत. 'आक्रमण' नावाने या युद्धाभ्यासात वायूसेनेचे वरिष्ठ पायलट सहभागी होत असून अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात हा अभ्यास केला जात आहे.
आजतकच्या वृत्तानुसार, पुर्व सेक्टरमधील वायूसेनेचे काही आयुधे आणि उपकरणे मध्य भागात रवाना झाली आहेत. तेथे माॅक ड्रिल अर्थात रंगीत तालिम होत आहे. राफेल आणि सुखोई -30 ही अत्याधुनिक लढावू विमाने रंगीत तालिमेत सहभागी झाली आहेत. शत्रूंच्या ठिकाणांचा अचूक वेध घेत नियोजनबद्ध बाँम्बवर्षावाचा सराव केला जात आहे.
राफेल लढावू विमानाची क्षमता काय?
चीन आणि पाकिस्तानसारख्या शत्रूंचा सामना करण्यासाठी लडाख क्षेत्राचे रक्षण करण्यासाठी भारताने पश्चिम बंगालमधील हसिमारा एअरबेस आणि अंबाला येथे 117 'गोल्डन ॲरो' राफेल लढाऊ विमाने तैनात केली आहेत. भारतीय हवाई दलाकडे 36 राफेल लढाऊ विमाने आहेत.
व्हिज्युअल रेंजच्या पलीकडे असलेल्या उल्का-एअर-टू-एअर क्षेपणास्त्रांव्यतिरिक्त, राफेलमध्ये SCALP एअर-टू-ग्राउंड लेझर-गाइडेड दारुगोळा आहे, जो 300 किलोमीटरहून अधिक अंतरावरील शत्रूला लक्ष्य करु शकतो.
रशियन हवाई संरक्षण प्रणाली - S-400 ही रशियन S-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली स्वातंत्र्यानंतर भारतासाठी सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची लष्करी खरेदी आहे.












Click it and Unblock the Notifications