गोळ्या घातल्यानंतर पतीने २-३ मिनिटांत माझ्या मांडीवर ... मृत शैलेशच्या पत्नी- मुलाने सांगितला थरार

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला. त्या हल्ल्यात २५ भारतीय आणि एका नेपाळी पर्यटकांसह २६ जणांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यात बळी पडलेल्या पर्यटकांपैकी सुरत शहरातील शैलेश कल्थिया हेही एक होते. ते आपल्या कुटुंबासह सुट्या घालविण्यासाठी पहलगामला गेले होते. कल्थिया कुटुंबाची हीच फॅमिली ट्रीप दुःखात बदलली. याच शैलेश यांचा मुलगा नक्ष्य कल्थिया याने हा हल्ल्याची डोळ्यासमोर घडलेली घटना कथन केली.

Pahalgam victim s story

काय म्हणाला नक्ष्य?

मृत शैलेश यांचा मुलगा नक्ष्य यांनी दशहतवाद्यांचा थरार मीडियाला सांगितला. ऐकून प्रत्येकाला धक्का बसेल असाच तो थरार होता. नक्ष्य म्हणाला, "आम्ही जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील 'मिनी स्वित्झर्लंड' पॉइंटवर होतो. आम्हाला गोळीबाराचा आवाज ऐकू आला आणि दहशतवादी आत घुसले आहेत असे वाटल्यावर आम्ही लपून बसलो. पण, त्यांनी आम्हाला शोधून काढले. आम्हाला दोन दहशतवादी दिसले. त्यापैकी एक दहशतवादी सर्व पर्यटकांना हिंदू व मुस्लिम असे दोन गटात विभागण्याचा आदेश देत होता. त्यानंतर सर्व हिंदू लोकांना गोळ्या घातण्यात आल्या.

तीन वेळा 'कलमा' म्हणायला सांगितले

नक्श कल्थिया पुढे म्हणाला, "दहशतवाद्यांनी सर्व पर्यटकांना तीन वेळा 'कलमा' पढण्यास सांगितले. ज्यांना कलमा म्हणता आला नाही, त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. दहशतवादी निघून गेल्यावर स्थानिक लोक आले आणि म्हणाले की जे वाचले त्यांनी ताबडतोब खाली उतरावे. आम्ही पॉइंटवरून खाली उतरल्यानंतर एक तासानंतर सैन्य आले. दहशतवादी माझ्या वडिलांना अजिबात बोलू देत नव्हते. दहशतवादी माझ्या आईला काहीही म्हणाले नाहीत. दहशतवाद्यांपैकी एक गोरा होता आणि दाढी ठेवली होती. त्याच्या डोक्यावर कॅमेरा बांधलेला होता. तो सर्व घटना रेकाँर्ड करत होता. त्यांनी महिला आणि मुलांना सोडून दिले."

पतीचे डोके पत्नीच्या मांडीवर होते

या भयावह घटनेची कहाणी शैलेशची पत्नी शितल यांनीही सांगितली. त्या म्हणाल्या, गोळीबारीचा आवाज आल्यावर आम्ही पळू लागलो. मात्र पळायला जागा नव्हती. अचानक एक दहशतवादी आमच्या समोर उभा राहिला. त्याने कलमा पढायला सांगितले. त्यानंतर त्याने हिंदू व मुस्लिम यांना वेगवेगळ्या गटात विभागले. ज्यांना कलमा पढता आला नाही. त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. त्याने आमच्यासमोर ६-७ जणांना गोळ्या घातल्या. त्याने इतक्या जवळून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या की गोळी लागल्यानंतर पर्यटक २-३ मिनिटांपेक्षा जास्त काळ जगले नाहीत. माझ्या नवऱ्याला गोळ्या घातल्यावर त्यांचे डोके माझ्या मांडीवर होते. मी काहीही करू शकत नव्हते. मला आश्चर्य वाटले की तिथे इतके पर्यटक असूनही, त्या भागात एकही सैन्य किंवा पोलिस अधिकारी उपस्थित नव्हता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+