पहलगाम हल्ल्यानंतर भारताचे मोठे पाऊल;16 पाकिस्तानी युट्यूब चॅनेलवर बंदी घातली, का घेतला असा निर्णय!
Pakistani YouTube channels Banned : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत सरकारने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे.
भारत सरकारने पाकिस्तानातील जवळजवळ सर्व प्रमुख वृत्तवाहिन्यांच्या यूट्यूब चॅनेलवर भारतात पाहण्यास बंदी घातली आहे. ज्यामध्ये जिओ न्यूज, डॉन न्यूज, समा टीव्ही, आर्य न्यूजसह 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी घालण्यात आली.

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृह मंत्रालयाच्या शिफारशींनुसार, भारत सरकारने जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी घटनेच्या पार्श्वभूमीवर, प्रक्षोभक आणि सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील सामग्री, खोटी आणि दिशाभूल करणारी विधाने आणि आपल्या सैन्य आणि सुरक्षा एजन्सींविरुद्ध चुकीची माहिती प्रसारित केल्याबद्दल डॉन न्यूज, समा टीव्ही, आर्य न्यूज, जिओ न्यूजसह 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली आहे.
On the recommendations of the Ministry of Home Affairs, the Government of India has banned the 16 Pakistani YouTube channels including Dawn News, Samaa TV, Ary News, Geo News for disseminating provocative and communally sensitive content, false and misleading narratives and… pic.twitter.com/AusR1fCkvN
— ANI (@ANI) April 28, 2025
हेरगिरीसाठी चिनी ड्रोनचा वापर- NIA सूत्र
दुसरीकडे, 22 एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटक अन् 2 स्थानिक अशा 28 लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारतीय लष्कराच्या वतीने, जम्मू आणि काश्मीरमध्ये आतापर्यंत 10 दहशतवाद्यांची घरे स्फोटात उडवून देण्यात आली आहेत. एनआयए या हल्ल्याचा तपास हाती घेतला आहे. तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी हेरगिरीसाठी चीनी ड्रोनचा वापर केला होता, अशी माहिती समोर आली आहे. ़
शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्यात चिनी ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो, असा संशय देखील एनआयए व्यक्त केला आहे. हल्ल्यानंतर दहशतवादी पुलवामा किंवा अनंतनागला पळून जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. हल्ल्यानंतर या मार्गांवरुन जाताना काही हालचाली दहशतवाद्यांच्या दिसून आल्या आहेत.
सिंधू पाणी करार रद्द, पाकिस्तानी व्हिसा देणे बंद
22 एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्लानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक निर्बंध लावण्यास सुरूवात केली. यामध्ये सिंधू पाणी कराराचे निलंबन, अटारी चेकपोस्ट बंद करणे, पाकिस्तानी नागरिकांसाठी सार्क व्हिसा सूट योजना निलंबित करणे आणि दोन्ही देशांमधील राजनैतिक कर्मचाऱ्यांची कपात यांचा समावेश आहे. त्यानंतर आज पुन्हा भारत सरकारच्या वतीने पाकिस्तानातील 16 युट्यूब चॅनेलवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
-
Box Office Report : 'द केरळ स्टोरी 2' ची जादू कायम; नवीन चित्रपटांची संथ सुरुवात, 'ओ रोमियो'ची घसरण -
आहार 2026: एक अनिवार्य व्यापार प्रदर्शन -
IND vs NZ Final: हेड-टू-हेडमध्ये टीम इंडिया 'किंग', पण वर्ल्ड कपमध्ये किवींचेच पारडे जड; आकडेवारी? -
परवानगीची गरज नाही!; रशियन तेल खरेदीबाबत भारताचे अमेरिकेला चोख प्रत्युत्तर; म्हणाले-राष्ट्रहित प्रथम -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
Bihar next cm : ठरलं! 'हा' नेता होणार बिहारचा नवा मुख्यमंत्री! नितीश कुमार दिल्लीला जाणार.. -
India Post GDS Result 2026: ग्रामीण डाक सेवक भरतीचा निकाल जाहीर; 'असा' तपासा तुमचा निकाल! -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य -
'धुरंधर-2' चा राडा! पहिल्याच दिवशी 'एवढी' कमाई; 'रणवीर'च्या चित्रपटाचे रेकॉर्डब्रेक ॲडव्हान्स बुकींग -
ऐतिहासिक विजय! भारताचा तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर कब्जा; न्यूझीलंडचा धुव्वा उडवत रचला नवा इतिहास









Click it and Unblock the Notifications