सीमेवर तणाव, सैन्याला दारूगोळा पुरवठा करणाऱ्या ऑर्डिनन्स कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील ऑर्डिनन्स फॅक्ट्री चंदा आणि मध्य प्रदेशातील खमरिया ऑर्डिनन्स फॅक्ट्रीमध्ये कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलली असून सीमेवर तणाव वाढला आहे. या परिस्थितीत सैन्याला दारुगोळा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी या फॅक्टरीतील सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ऑर्डिनन्स फॅक्टरीतील कर्मचा-यांच्या सुट्ट्या रद्द
भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावामुळे सैन्याला सतत दारुगोळा पुरवठा आवश्यक आहे. यासाठी ऑर्डिनन्स फॅक्टरींवर मोठी जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील ऑर्डिनन्स फॅक्ट्री चंदा आणि मध्य प्रदेशातील खमरिया ऑर्डिनन्स फॅक्ट्रीमध्ये कर्मचाऱ्यांच्या अधिकच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 4 मे रोजी सकाळी हा आदेश जारी करण्यात आला, आणि सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर परतण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी 2 मे रोजी खमरिया ऑर्डिनन्स फॅक्ट्रीमध्येही दोन दिवसांपेक्षा जास्त कालावधीच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या होत्या.

या फॅक्टरींमध्ये सध्या सैन्यासाठी आवश्यक असणाऱ्या दारुगोळाचे उत्पादन जोरात सुरू आहे. चंदा ऑर्डिनन्स फॅक्ट्री ही देशातील सर्वात मोठ्या आयुध निर्माण केंद्रांपैकी एक आहे. याठिकाणी बॉम्ब, मिसाइल्स आणि इतर शस्त्रांचे उत्पादन केले जाते. खमरिया ऑर्डिनन्स फॅक्ट्रीही सैन्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. या फॅक्टरींमध्ये सध्या 24 तास काम सुरू आहे आणि कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइम काम करण्यास सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये काही नाराजी आहे, परंतु देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
राजस्थान सीमेवर बीएसएफची कारवाई
दरम्यान 3 मे 2025 रोजी रात्री उशिरा राजस्थानमधील श्रीगंगानगर सीमेवर बीएसएफच्या जवानांनी एका पाकिस्तानी रेंजरला पकडले. हा रेंजर भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होता, जेव्हा बीएसएफच्या गस्ती पथकाने त्याला ताब्यात घेतले. हा रेंजर संशयास्पद हालचाली करत होता आणि त्याच्याकडे काही संवेदनशील माहिती असण्याची शक्यता आहे. बीएसएफच्या राजस्थान फ्रंटियरने त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. या कारवाईमुळे बीएसएफच्या सतर्कतेचे कौतुक होत आहे, विशेषतः जेव्हा पहलगाम हल्ल्यानंतर सीमेवर तणाव वाढला आहे.












Click it and Unblock the Notifications