Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

2026चे राजकीय रणकंदन: बंगाल ते तामिळनाडू राज्यात कोणाचे पारडे जड?, जाणून घ्या पहिला Opinion Poll

opinion poll 2026 assam west bengal kerala tamil nadu : देशातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. २०२६ च्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजायला अवघे दोन महिने शिल्लक असताना, 'व्होट व्हायब इंडिया ट्रॅकर २०२६' चा पहिला ओपिनियन पोल समोर आला आहे.

आसाम, पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या चार प्रमुख राज्यांची राजकीय दिशा स्पष्ट करणारा हा अहवाल अनेक धक्कादायक आणि मनोरंजक कल दर्शवत आहे.

opinion poll 2026

१. आसाम : हिमंता बिस्वा Vs गौरव गोगोई

आसाममध्ये सत्ताधारी NDA (भाजप) आणि 'इंडिया' (INDIA) आघाडी यांच्यात 'कांटे की टक्कर' पाहायला मिळत आहे.

मतांची टक्केवारी : NDA ३३.४% तर इंडिया आघाडी ३०.९% मतांसह अटीतटीच्या लढतीत आहेत.

वयोगटाचा प्रभाव : मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांना ५५ वर्षांवरील ज्येष्ठ मतदारांचा (५४%) मोठा पाठिंबा आहे. मात्र, तरुण मतदारांमध्ये NDA काहीशी कमकुवत दिसत आहे.

पसंतीचा चेहरा : मुख्यमंत्रीपदासाठी हिमंता सर्मा यांना ४८.२% लोकांची पसंती आहे, तर गौरव गोगोई ४२% सह त्यांना जोरदार टक्कर देत आहेत.

२. पश्चिम बंगाल : 'दीदी' गड राखणार की भाजप मुसंडी मारणार?

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांची जादू चालताना दिसत असली, तरी भाजपचा प्रभाव दुर्लक्षित करण्याजोगा नाही.

तृणमूल काँग्रेस (TMC) : ३९.६% मतांसह ममता दीदी आघाडीवर आहेत. महिला आणि मुस्लिम मतदारांमध्ये त्यांची पकड मजबूत आहे.

भाजप : ३०.५% मतांसह भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेषतः SC, ST, OBC आणि तरुण मतदारांमध्ये भाजपचा आलेख वाढताना दिसत आहे.

अनिर्णीत मतदार : येथील १८.५% मतदार अजूनही द्विधा मनस्थितीत आहेत, जे निकालाचे चित्र कोणत्याही बाजूने फिरवू शकतात.

3. केरळ : १० वर्षांनंतर सत्तापालटाचे संकेत?

केरळचा इतिहास दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याचा आहे, मात्र गेल्या वेळी डाव्यांनी (LDF) इतिहास बदलला होता. यावेळी चित्र पुन्हा बदलताना दिसत आहे.

UDF (काँग्रेस) : ३२.७% मतांसह काँग्रेस आघाडीवर असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट होत आहे.

LDF (डावे) : २९.३% मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत.

भाजप (NDA) : १९.८% मतांसह भाजपने केरळमध्ये आपली ताकद लक्षणीयरीत्या वाढवली आहे.

तरुण मतदारांचा कल काँग्रेसकडे आहे, तर ३५-५४ वयोगटात डावे आजही मजबूत आहेत. भाजपच्या वाढत्या मतांमुळे प्रस्थापित दोन्ही आघाड्यांच्या अडचणी वाढू शकतात.

4. तामिळनाडू : द्रमुक आणि अद्रमुकमध्ये चुरस; 'TVK' चा नवा फॅक्टर

तामिळनाडूमध्ये सत्ताधारी DMK आणि विरोधी पक्ष AIADMK यांच्यात केवळ २ टक्क्यांचा फरक आहे, ज्यामुळे ही निवडणूक अत्यंत रोमांचक झाली आहे.

  • DMK+ : ३५.८% मते (ज्येष्ठ आणि पुरुष मतदारांचा पाठिंबा).
  • AIADMK+ : ३३.८% मते (महिला मतदारांची मोठी पसंती).
  • TVK चा उदय : अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने १९.२% मतांचा अंदाज मिळवून सर्वांना चकित केले आहे. तरुणांमध्ये या पक्षाची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे.

'स्विंग व्होटर' ठरवणार सत्तेचे समीकरण!

या ओपिनियन पोलमधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 'अनिर्णीत मतदार'. चारही राज्यांमध्ये मोठ्या संख्येने अशा मतदारांचा वर्ग आहे ज्यांनी अद्याप कोणाला मतदान करायचे हे ठरवलेले नाही. शेवटच्या दोन महिन्यांतील जाहीरनामे, उमेदवारांची निवड आणि स्थानिक मुद्दे हे या निवडणुकांचे खरे 'किंगमेकर' ठरणार आहेत. एकूणच, २०२६ च्या या विधानसभा निवडणुका केवळ राज्यांचे भवितव्यच नव्हे, तर 2029 च्या आगामी राष्ट्रीय राजकारणाची नांदी ठरणार आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+