Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Operation Sindoorमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे जाहीर; मुंबई स्फोटातील मास्टरमाईंडचाही खात्मा

Operation Sindoor; Abu Jundal Mohammad Yusuf : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर भारताने 7 मे रोजी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले आणि पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ ठिकाणांना लक्ष्य केले. यात काही दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता.

दरम्यान, भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये अबू जुंदाल आणि मोहम्मद रौफ अझहरसह 5 दहशतवादी मारले गेले. युसूफ हा कंधार अपहरणाचा सूत्रधार होता आणि जुंदाल मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड होता, त्याचा देखील यात खात्मा झाला.

वृत्तसंस्था एएनआयने शनिवारी सूत्रांच्या हवाल्याने त्यांच्या नावांची यादी जाहीर केली. हे पाचही दहशतवादी एकत्र मारले गेले की वेगळे मारले गेले याची माहिती अद्याप मिळालेली नाही. तर ऑपरेशन सिंदूरमध्ये शंभरपेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आलेली आहे.

Operation Sindoor

ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झालेल्या 5 खतरनाक आंतकवाद्यांची नावं आली समोर..! कोण होते ते, त्यांनी कोणत्या कारवाईत भाग घेऊन भारतविरोधी कारवाया केल्या होत्या, जाणून घ्या सविस्तर..!

  • मुदस्सर खादियान उर्फ ​​अबू जुंदाल

मुदस्सर खादियान उर्फ अबू जुंदाल हा लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी होता. तो मुरीदके येथील मरकज तैयबाचा प्रभारी होता. 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात त्याचा सहभाग होता. त्यांच्या अंत्यसंस्कारात पाकिस्तानी सैन्याने त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

  • हाफिज मुहम्मद जमील

जैश-ए-मोहम्मदचा एक मोठा दहशतवादी. मौलाना मसूद अझहर याचे सर्वात मोठे मेहुणे. बहावलपूरमधील मरकज सुभान अल्लाहचे प्रभारी. तरुणांना कट्टरतावादी बनवण्यात आणि निधी देण्यात सक्रिय असलेला दहशतवादी म्हणून हाफिज मुहम्मद जमीलचा समावेश होता.

Take a Poll

  • मोहम्मद युसूफ अझहर उर्फ ​​उस्तादजी, मोहम्मद सलीम, घोसी साहब

जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आणि मसूद अझहरचा मेहुणा. दहशतवादी संघटनेत शस्त्रास्त्र प्रशिक्षणाचा प्रभारी. तो जम्मू आणि काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होता आणि आयसी-814 विमान अपहरण म्हणजेच कंधार अपहरणाचा कट रचणाऱ्यांमध्ये त्याचा प्रमुख समावेश होता.

  • खालिद उर्फ ​​अबू आकाशा

लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी. अफगाणिस्तानातून शस्त्रास्त्रांच्या तस्करीत सहभागी होता. जम्मू आणि काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी. अंत्यसंस्कार फैसलाबादमध्ये झाले. यामध्ये पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांनीही भाग घेतला.

  • मोहम्मद हसन खान

पाकव्याप्त काश्मीरमधील जैशच्या ऑपरेशनल कमांडर मुफ्ती असगर खान काश्मीरी याचा मुलगा मोहम्मद हसन जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचे समन्वयक म्हणून काम करत होता.

या कारवाईनंतर पाकिस्तानमधील लष्कर आणि प्रशासनाच्या समर्थनाने चालणाऱ्या दहशतवाद्यांच्या वास्तव्यावर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. भारताच्या या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या दुटप्पीपणा उघडा पडला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+