सन्मानाने निरोप द्या, OneIndia वर आपल्या आप्तजनांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करा
आपल्याला प्रिय असलेल्या व्यक्तीला निरोप देणे हे कधीच सोपे नसते. हे जीवनातील एक खोल दुःख असते. आठवणींनी भरलेले, शांततेने व्यापलेले आणि कधीही न मिटणाऱ्या ओढीने भारलेले. OneIndia मध्ये आम्ही मानतो की, प्रत्येक जीवन हे प्रेम, सन्मान आणि जिव्हाळ्याने स्मरण करण्यास पात्र असते.

याच कठीण काळात कुटुंबीयांना मदत करण्यासाठी, आम्ही एक सौम्य आणि अर्थपूर्ण उपाय सादर केला आहे - आपल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणींना जपण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी. आमचा ऑनलाईन श्रद्धांजली आणि स्मरणपत्र सेवा प्लॅटफॉर्म आता इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे आणि लवकरच सात भारतीय भाषांमध्ये - हिंदी, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम, मराठी आणि ओडिया देखील उपलब्ध होणार आहे.
आता आपण आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृतीसाठी श्रद्धांजली अर्पण करू शकता आणि त्यांची जीवनकथा आपल्या मनाला जवळच्या भाषेत शेअर करू शकता.
आपण जपलेल्या आठवणी शेअर करायच्या असोत, अंतिम संस्काराची माहिती द्यायची असो, किंवा नातेवाईक आणि मित्रमंडळींना सेवा व विधीबाबत कळवायचे असो हे सर्व आता सहज शक्य आहे, आपण जिथे असाल तिथून. केवळ काही मिनिटांत आपण अशी श्रद्धांजली तयार करू शकता, जी आपल्या प्रिय व्यक्तीचे जीवन, प्रेम आणि वारसा यांचे खर्या अर्थाने प्रतिबिंब असेल.
श्रद्धांजली तयार करताना आपल्याला काय लागेल?
- हृदयस्पर्शी श्रद्धांजली तयार करण्यासाठी खालील माहिती तयार ठेवा
- आवश्यक माहिती (Mandatory)
- पहिले नाव
- आडनाव
- मृत्यूची तारीख व ठिकाण
- राज्य / विभाग
श्रद्धांजली कशी तयार करावी
- https://www.oneindia.com/ownstory/ या वेबसाइटला भेट द्या
- 'Obituary' (श्रद्धांजली) विभागात जा
- दिलेल्या सोप्या स्वयं-सहाय्य फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरून घ्या
- श्रद्धांजलीला आपल्या आवडीनुसार थीम, संगीत, फोटो आणि कार्यक्रमाची माहिती देऊन वैयक्तिक स्वरूप द्या
- फोटो, व्हिडिओ आणि विधी, अंत्यसंस्कार वा स्मरणसभेच्या आमंत्रणांची माहिती जोडा
- तुमचा संदेश प्रसिद्धीसाठी तयार आहे!
ऐच्छिक पण महत्त्वपूर्ण माहिती (Optional):
- जन्मतारीख
- जन्मस्थान
- धर्म
- कुटुंबाची माहिती (पालक, मुले)
- शिक्षण आणि व्यावसायिक प्रवास
- एक खरे आणि स्पष्ट छायाचित्र आवश्यक आहे.
जितकी अधिक माहिती आपण देता, तितकी श्रद्धांजली अधिक वैयक्तिक आणि स्पर्श करणारी ठरेल.
श्रद्धांजली कशी तयार करावी?
सन्मानपूर्वक निरोप... आता सहज शक्य
ही सेवा पूर्णतः मोफत आणि वापरण्यास अतिशय सोपी आहे. याद्वारे आपण आपल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणी एकाच सुंदर आणि भावपूर्ण संदेशाद्वारे शहर, राज्य आणि देशाच्या पलीकडे कुटुंबीय व मित्रांपर्यंत पोहोचवू शकता.
आपल्या आप्तजनांच्या आठवणी केवळ ओढीनं नव्हे, तर कृतज्ञता, सन्मान आणि प्रेमानं साजऱ्या करा.
कारण प्रत्येक जीवन एक कथा असते. जी सांगितली जायलाच हवी.
आणि प्रत्येक निरोप हा आठवणीत राहण्यासारखा असतो.
OneIndia हे स्मरण वैयक्तिक, शांत आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी आपल्यासोबत आहे.












Click it and Unblock the Notifications