काँग्रेसचा बाहेरून पाठींबा; ओमर अब्दुल्लांनी घेतली शपथ, अजून कोण झाले मंत्री पहा...
Jammu And Kashmir Assembly Election 2024 : नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी आज बुधवारी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. केंद्रशासित प्रदेशाचे ते पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. श्रीनगर येथील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर येथे हा शपथविधी सोहळा पार पडला.
राहुल गांधी, प्रियांका गांधी, सपा प्रमुख अखिलेश यादव, आप नेते संजय सिंह यांच्यासह सहा पक्षांचे नेते शपथविधीला उपस्थित होते. दरम्यान, एकत्र निवडणूक लढवूनही काँग्रेसने सरकारमध्ये सहभागी घेतला नाही. उपमुख्यमंत्र्यांसह इतर चार मंत्र्यांचाही आज शपथविधी झाला.

शपथविधी घेणारे मंत्री कोण
ओमर अब्दुल्लांसह उपमुख्यमंत्री म्हणून सुरेंदर चौधरी यांनीही शपथ घेतली. ते नौशेराचे आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांचा 7 हजार 819 मतांनी पराभूत केले होते.
Omar Abdullah sworn in as first Chief Minister of Union Territory Jammu and Kashmir
— ANI Digital (@ani_digital) October 16, 2024
Read @ANI Story | https://t.co/beResivrCu#Omarabdullah #JammuKashmir #INDIAbloc pic.twitter.com/9VvBu7G25L
-मंत्री सकीना इट्टू: डीएस पोरा येथील आमदार आहेत. 2008 मध्ये जम्मू-काश्मीरमधून एकमेव महिला मंत्री होत्या.
-मंत्री जावेद राणा : मेंढर येथील आमदार आहेत. त्यांना प्रथमच मंत्री करण्यात आले आहे.
-मंत्री जावेद अहमद दार : रफियााबादमधून निवडणूक जिंकली आहे. हे पहिल्यांदाच आमदार झाले आहेत.
-मंत्री सतीश शर्मा: ते छांब मतदारसंघातून अपक्ष आमदार आहेत. ओमर अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा दिला आहे. शपथ घेतल्यानंतर त्यांनी 'जय माता दी'चा नारा दिला.
या कारणाने काँग्रेसचा बाहेरुन पाठींबा
काँग्रेसने सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. त्यांचा एकही आमदार मंत्री होणार नाही. मात्र, काँग्रेस ओमर सरकारला पाठिंबा देत राहील. जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळेपर्यंत आम्ही लढत राहू, असे काँग्रेसने म्हटले आहे. त्यामुळे आज फक्त नॅशनल काँन्फरन्सच्या मंत्र्यांचाच शपथविधी पार पडला.
ठाकरे, पवारांनाही होते आमंत्रण
आजच्या शपथविधीला इंडिया आघाडीमधील अनेक बडे नेते उपस्थित होते. महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे, शरद पवार, लालू प्रसाद यादव आणि अरविंद केजरीवाल यांच्यासह सुमारे 50 व्हीआयपींना निमंत्रण पाठवण्यात आले होते. मात्र, केजरीवाल आणि ममता बॅनर्जी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत.
-
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Gudi padwa 2026 wishes in Marathi : गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे खास 30 शुभेच्छा संदेश शेअर करा -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Chaitra Amavasya 2026 :18 की 19 मार्च? चैत्र अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, शुभ-मुहूर्त, महत्व -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न! -
प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्रात 5 हजार पदांसाठी मेगाभरती; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा -
आजचे राशीचक्र: कुणाचे नशीब चमकणार आणि कुणाला संघर्ष करावा लागणार? वाचा आजचे राशीभविष्य










Click it and Unblock the Notifications