Old SIM cards can be replaced: सर्व सीमकार्ड बदलणार? हे मोठे कारण आले समोर, सरकार करतेय मोठी तयारी
Old SIM cards can be replaced : जुने सीमकार्ड बदलणार असून आता त्याजागी नवीन सीमकार्ड येणार आहे. यासाठी सरकारकडून विशेष तयारी सुरु आहे. त्यामुळे जर आपल्याकडे जुने सीमकार्ड असेल तर नवीन सीमकार्ड आपल्याला घ्यावे लागणार आहे.
देशातील सायबर सुरक्षा एजन्सींच्या पडताळणीनंतर हे पाऊल केंद्र सरकार उचलेल. यासंदर्भात केंद्र सरकार मोबाईलधारकांच्या जुन्या सीमकार्डला बदलण्यासंदर्भात विचारविमर्श करत आहे.यासंदर्भात 'अमर उजाला'ने वृत्त दिले आहे.

सीमकार्डसंदर्भात अनेक तक्रारी, बोगस सीमकार्ड, विविध नावाने वापरण्यात येणारे सीमकार्ड, भारतीयांच्या नावावर इतरांकडून घेण्यात येणारे सीमकार्ड यातून राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहचू शकतो, अशा स्थितीत राष्ट्रीय सुरक्षा सायबर समन्वय संस्था दक्षता घेते आणि उपाययोजना सुचवते. तसेच सायबर सुरक्षाविषयक पडताळणीही करते.
एनसीएससीने पडताळणीत काय आढळले?
प्राप्त माहितीनुसार, काही चिनी चिप्स भारतीय सीमकार्डमध्ये आढळले आहेत. सीमकार्डमधील चिप्स या अधिकृत पुरवठादाराकडून यायला हव्या, पण त्या चिप्समध्ये चीनी घटक असल्याचे समोर आले आहे. चिनी चिप्स किंवा त्यासंबंधित घटक जे अधिकृत सोर्स नव्हते, ते भारतीय सीमकार्डमध्ये आढळले आहे, ते चीनकडून मागवण्यात आले आहे असा त्याचा अर्थ आहे.
एनसीएसी अर्थात राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वय संस्थेने देशातील प्रमुख टेलिकाॅम कंपन्यांसोबत एक बैठक घेतली त्यात सीमकार्ड बदलण्यासंदर्भातील रुपरेषेवर चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे आता आपल्या मोबाईलमध्ये नवे सीमकार्ड येऊ शकते.
मार्च 2021 मध्ये, दूरसंचार विभाग (DoT) ने युनिफाइड ऍक्सेस सर्व्हिस लायसन्समध्ये सुधारणा केली त्यानुसार, दूरसंचार कंपन्या कोणत्याही अविश्वासू विक्रेत्याकडून उपकरणे खरेदी करू शकत नाहीत. विश्वासू पुरवठादारांना चिप्स आणि तत्सम गोष्टी पुरवठा करण्याची मान्यता एनसीसीला केवळ देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
विक्रेत्याकडून गैरवापर झाला..
काही विक्रेत्यांनी या प्रणालीचा देखील गैरवापर केला आणि त्यांनी पुरवलेल्या चिप्समध्ये चिनी घटक असल्याचे तपासात आढळून आले.त्यामुळे, प्रभावित सिम कार्ड्स 2021 पूर्वीच्या आणि नंतरच्या दोन्ही कालखंडातील असू शकतात.












Click it and Unblock the Notifications