तुम्हाला स्वेच्छानिवृत्ती घ्यायचीय..? NPS ने दिली ही नवीन मार्गदर्शक तत्व, पहा काय बदलले...
नवी दिल्ली : राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजेच एनपीएसने आता केंद्रीय कर्मचाऱ्यांबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता एनपीएस अंतर्गत येणारे केंद्रीय कर्मचारी 20 वर्षांची सलग सेवा पूर्ण केल्यानंतर कधीही स्वेच्छेने निवृत्त होऊ शकतात. ही नवी तरतूद आता करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की, नोकरीत कधीही रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 20 वर्षे अखंड सेवा पूर्ण केल्यानंतर स्वेच्छानिवृत्तीची सुविधा मिळेल. मात्र हे करताना एनपीएसने काही गाईडलाईनही दिल्या आहेत. त्यानुसार स्वेच्छेने निवृत्ती घेताना कर्मचाऱ्यांना तीन महिने अगोदर हे कळवावे लागेल, असेही सांगण्यात आले आहे.
एनपीएसने प्रसिद्ध केले नवे नियम
नॅशनल पेन्शन स्कीम अर्थात NPS, जानेवारी 2004 मध्ये सुरू करण्यात आली. ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती योजना होती. 2009 मध्ये, त्यात सुधारणा करण्यात आली आणि खाजगी कर्मचाऱ्यांसह सर्वांसाठी खुली करण्यात आली. NPS ही एक दीर्घकालीन स्वैच्छिक पेन्शन योजना आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक किंवा खाजगी सेवानिवृत्ती निधी तयार करण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. सरकार तसेच पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) यांच्याद्वारे ती चालवले जाते. आता, त्यांच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, त्यात नमूद केले आहे की केंद्रीय कर्मचारी एनपीएस अंतर्गत स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय निवडू शकतात.

एनपीएसने काय केला नवा नियम
कार्मिक मंत्र्यांच्या अखत्यारीतील असलेल्या निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने (DoP&PW) एक नवे धोरण तयार केले आहे. केंद्रीय नागरी सेवा 2021 च्या नियमांनुसार NPS मध्ये सहभागी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना ही सुविधा दिली जाणार आहे. सेवा नियमाच्या नियम 12 अंतर्गत स्वेच्छानिवृत्तीची निवड करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ठराविक कालावधीनंतर सेवानिवृत्तीची परवानगी दिली जाईल आणि ते NPS नियमांनुसार पेन्शन देण्यास पात्र असतील. ज्या कर्मचाऱ्यांची सलग 20 वर्षे सेवा झाली आहे त्यांना स्वेच्छानिवृत्तीची सुविधा मिळणार आहे.
निवृत्तीनंतर मिळणार सर्व सुविधा
मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे की, ज्या कर्मचाऱ्याला स्वेच्छानिवृत्ती घ्यायची असेल त्यांनी किमान तीन महिने अगोदर याबाबत लेखी कळवावे. स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अर्ज नियोक्ता नाकारू शकत नाही. नियोक्त्याला दिलेला तीन महिन्यांचा नोटिस कालावधी संपेल त्या दिवसापासून ते लागू होईल. दरम्यान, पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) द्वारे निर्धारित स्वेच्छानिवृत्तीची निवड करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकार सर्व सुविधा प्रदान करेल. या सर्व सुविधा नियमित निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा असतील. हे लक्षात घ्यावे की जर कर्मचाऱ्याने इतर कोणतेही NPS खाते उघडले असेल, तर त्याची माहिती PFRDA ला द्यावी लागेल.
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी






Click it and Unblock the Notifications