Nitish Kumar oath नितीश कुमार बिहारचे दहाव्यांदा मुख्यमंत्री, आज शपथविधी! कोण कोण येणार? वाचा
Nitish Kumar 10th CM Oath Today : बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) सरकार स्थापन होण्यासाठी ऐतिहासिक क्षण जवळ आला आहे. जेडी(यू)चे नेते नितीश कुमार हे आज, २० नोव्हेंबर २०२५ रोजी विक्रमी दहाव्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. हा भव्य सोहळा पाटणाच्या प्रसिद्ध गांधी मैदानात सकाळी ११:३० वाजता होणार आहे. निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर एनडीएच्या या शक्तीप्रदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

विक्रमी दहावा शपथविधी
नितीश कुमार चौथ्यांदा गांधी मैदानात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, जो त्यांच्या राजकीय जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, तसेच एनडीएचे मित्रपक्ष तेलुगु देसम पार्टीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू आणि ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्यासह एनडीएशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
सुरक्षेचा कडक बंदोबस्त
कार्यक्रमासाठी विशेष सुरक्षा गट (SPG) लक्ष ठेवून आहे. पाटणा पोलिसांनी गांधी मैदानाच्या परिसरात ड्रोन आणि १२८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. २००० हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
मंत्रिमंडळ आणि उपमुख्यमंत्रिपदाचे चित्र स्पष्ट
एनडीएच्या नेत्यांनी मंत्रिमंडळ आणि खातेवाटपाचा अंतिम निर्णय घेतला आहे.
उपमुख्यमंत्री कायम
भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून सम्राट चौधरी आणि उपनेते म्हणून विजय कुमार सिन्हा यांची निवड झाली आहे. त्यामुळे या दोघांना उपमुख्यमंत्रिपद कायम मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
खातेवाटप
भाजप आणि जेडी(यू) यांच्यात १६ आणि १४ मंत्रिपदांचा फॉर्म्युला निश्चित होण्याची शक्यता आहे. मात्र, गृह आणि शिक्षण मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या खात्यांवर दोन्ही पक्षांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा सुरू होती.
मित्रपक्षांना स्थान
एनडीएतील इतर मित्रपक्षांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. यात चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टी (राम विलास) ला तीन, जीतन राम मांझी यांच्या एचएएम(एस) आणि उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चा (RLM) ला प्रत्येकी एका मंत्रिपदावर समाधान मानावे लागू शकते.
विधानसभा अध्यक्ष
विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे प्रेम कुमार आणि जेडी(यू)चे विजय चौधरी यांच्यासह नरेंद्र नारायण यादव यांच्या नावाची चर्चा आहे.
राजकीय महत्त्व
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने २ ०२ जागा जिंकून महाआघाडीवर दणदणीत विजय मिळवला. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील या नव्या सरकारची स्थापना, भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतरही (८९ जागा) नितीश कुमार यांच्या अनुभवी नेतृत्वावर एनडीएने पुन्हा शिक्कामोर्तब केल्याचे दर्शवते.
-
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
Kuldeep yadav wedding date : कुलदीप यादव बोहल्यावर चढणार! कोण आहे होणारी पत्नी वंशिका? जाणून घ्या -
पुरुषांनो, 'या' 5 सामान्य लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; असू शकतो वाढलेल्या प्रोस्टेटचा धोका!









Click it and Unblock the Notifications