Nikhil Kamath: देशातील सर्वात तरुण अरबपती ज्याने PM मोदींची पॉडकास्ट घेतली; वाचा त्याची स्टोरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पॉडकास्ट मुलाखत सध्या सोशल मीडियापासून राजकीय वर्तुळापर्यंत चर्चेचा विषय ठरली आहे. पीएम मोदींची ही पहिली पॉडकास्ट मुलाखत आहे, हे 'पॉडकास्ट- डब्ल्यूटीएफ इज' च्या ट्रेलरमध्येच समोर आले आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून एकीकडे काँग्रेस हे पंतप्रधान मोदींच्या शब्दांची खिल्ली उडवताना दिसत आहे, तर दुसरीकडे सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींची मुलाखत घेणारा निखिल कामत कोण आहे हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत.

कोण आहे निखिल कामत?
निखिल कामत हा पॉडकास्टच्या दुनियेमध्ये लोकप्रिय नसला तरी ट्रेडिंग क्षेत्रात रुची असणाऱ्यांना त्याचे नाव माहीत आहे. ऑनलाइन ब्रोकरेजचे काम करणारे ट्रेडिंग प्लॅटफॉर्म (Zerodha)'झिरोधा'चा निखिल कामत हा सह-संस्थापक आहे. या Zerodha कंपनीचा तो सह-संस्थापक आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी (CIO) ही आहे. लोक झिरोधाला भारतीय वित्तीय बाजाराचे रॉकेट म्हणतात कारण याने आर्थिक बाजारपेठेत क्रांती घडवून आणली आहे. पूर्वी लोक ब्रोकरेजचे काम हाताने करायचे पण झिरोधाने लोकांना एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला.
१६ वर्षी सोडले शिक्षण
निखिल कामथने वयाच्या 16 व्या वर्षी शिक्षण सोडले. 5 सप्टेंबर 1987 रोजी बेंगळुरू येथे जन्मलेल्या निखिल कामथचे वडील कॅनरा बँकेत काम करत होते. आई एक कलाकार होती. निखिलचे सुरुवातीचे शिक्षण बंगळुरूमध्येच झाले. शाळेमध्ये रस नसल्यामुळे त्याने अवघ्या 16 व्या वर्षी आपले शिक्षण सोडले. त्यानंतर वयाच्या 17 व्या वर्षी, त्यांनी एका कॉल सेंटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. जिथे त्यांना दरमहा 8,000 रुपये मिळत होते.
झिरोधाची केली स्थापना
निखिल कामथने त्याचा भाऊ नितीन कामथ यांच्यासमवेत झिरोधाची स्थापना केली. यासोबतच त्यांनी त्यांचे शेअर ट्रेडिंग कौशल्ये विकसित करण्यास सुरुवात केली. 2010 मध्ये त्यांचा भाऊ नितीन कामथ यांच्यासमवेत झिरोधाची स्थापना केली. तोपर्यंत त्याने गुंतवणूक आणि व्यवस्थापनाची सर्व कौशल्ये आत्मसात केली होती. निखिलने पारंपारिक ब्रोकरेज फर्म्सना थेट आव्हान दिले. झिरोधाचा मुख्य उद्देश व्यापार सोपा, स्वस्त आणि प्रत्येक वर्गातील लोकांसाठी सुलभ करणे हा होता.
आज आहे अरबपती
झिरोधाने थेट पारंपरिक ब्रोकरेज फर्मला आव्हान दिले होते. सुरुवातीला ही मोठी जोखीम होती पण साहसाला जीवनातील सर्वोत्तम गोष्ट मानणाऱ्या निखिलने ही जोखीम पत्करली आणि त्यात तो यशस्वी झाला. डिसेंबर 2024 मध्ये निखिल कामथ $ 3.3 अब्ज किमतीच्या मालमत्तेचा मालक झाला. हुरुनच्या अहवालात झिरोधाचे मूल्य $ 7.7 अब्ज होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आज निखिल कामत 3.3 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीचा मालक आहे. वयाच्या 34 व्या वर्षी तो देशातील सर्वात तरुण अब्जाधीश बनला आहे.
People with The Prime Minister Shri Narendra Modi | Ep 6 Trailer@narendramodi pic.twitter.com/Vm3IXKPiDR
— Nikhil Kamath (@nikhilkamathcio) January 9, 2025
मोदींची स्टाईल चर्चेत
जो आर्थिक बाजारपेठेतील तज्ज्ञ आहे, तो पॉडकास्टच्या जगात काय करत आहे आता प्रश्न अनेकांना पडतो. पॉडकास्टचे जग हा निखिलचा छंद आहे. या छंदानेच निखिल कामतला पॉडकास्टच्या जगात आणले. मार्च 2023 मध्ये, निखिल कामतने त्याचे पॉडकास्ट 'WTF is' लाँच केले. जे काही वेळातच यशस्वी झाले. आता मोदींच्या पॉडकास्टमुळे 'WTF' पुन्हा चर्चेत आले आहे. मनोरंजन आणि सामाजिक अशा अनेक क्षेत्रातील लोक या शोचा भाग बनले आहेत. या शोमध्ये पीएम मोदींची फनी स्टाइलही पाहायला मिळाली. 'मीही माणूस आहे, देव नाही, माझ्याकडूनही चुका होतात' असं त्यांनी म्हटलं होतं.












Click it and Unblock the Notifications