Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

"2008 च्या 26/11 हल्ल्याचा मुख्य सूत्रधार": राणाच्या प्रत्यार्पणावर दहशतवादविरोधी एजन्सी NIAचे विधान

NIA's first reaction after extradition of Mumbai 26/11 attack accused Tahawwur Rana : मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर हुसैन राणा आता भारताच्या ताब्यात आहे. त्याच्या प्रत्यार्पणाला यश मिळाले असून त्याचा ताबा सध्या एनआयएकडे आहे. 2008 मध्ये झालेल्या मुंबईवरील हल्ल्यातील मुख्य सूत्रधार राणाबद्दल राष्ट्रीय तपास संस्थेची पहिली प्रतिक्रीया समोर आली आहे.

26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर हुसैन राणा याच्या यशस्वी प्रत्यार्पणाबद्दल राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) आपली पहिली प्रतिक्रीया दिली आहे. एनआयए म्हणाले की, 2008 च्या हल्ल्यामागील मुख्य सूत्रधाराला न्यायाच्या कटघऱ्यात आणण्यासाठी अनेक वर्षांच्या "सतत आणि ठोस प्रयत्न केले ज्याची पुर्तता केली" असे म्हटले आहे.

NIA s first reaction

26/11 च्या हल्ल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या भारताच्या उच्च दहशतवादविरोधी एजन्सीने सांगितले की, "भारत-यूएस प्रत्यार्पण करारानुसार राणाच्या प्रत्यार्पणासाठी त्याला अमेरिकेत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. राणाने भारतातील प्रत्यार्पण रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला होता पण अमेरिकन न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली. त्यानंतर हे प्रत्यार्पण यशस्वी ठरले.

एनआयएने प्रत्यार्पणासाठी आटोकाट केले होते प्रयत्न

यूएस स्काय मार्शलच्या मदतीने NIA ने संपूर्ण प्रत्यार्पण प्रक्रियेद्वारे इतर भारतीय गुप्तचर संस्था, NSG सोबत अत्यंत जोमाने काम केले, यामध्ये भारताचे परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालयाने हे प्रकरण यशस्वी करण्यासाठी युनायटेड स्टेट्समधील इतर संबंधित अधिकाऱ्यांशी योग्य आणि वेळोवेळी समन्वय साधला."

कधी केला होता राणाच्या प्रत्यार्पणासाठी आदेश जारी

कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल डिस्ट्रिक्टच्या यूएस डिस्ट्रिक्ट कोर्टाने 16 मे 2023 रोजी राणाच्या प्रत्यार्पणासाठी आदेश जारी केला होता, परंतु राणाने यूएस सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. ज्यामुळे ही प्रत्यार्पण प्रक्रीया थोडी विलंबित झाली पण अमेरिकन न्यायालयाने त्याचे अपील फेटाळल्यानंतर प्रत्यार्पणाचा मार्ग फेब्रुवारीत मोकळा झाला होता त्यानंतर ही प्रक्रिया वेगाने पुढे सरकली आणि आता राणा भारताच्या ताब्यात आहे. आता राणाचे प्रत्यार्पण हे 26/11 हल्ल्यातील शहीद झालेले सैनिक, पोलिस आणि मृत नागरिकांच्या परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.

..26/11 चा 'तो' भीषण हल्ला

नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईत झालेल्या भीषण हल्ल्याच्या नियोजनात राणा, पाकिस्तानी सह-कारस्थानकर्त्यांसोबत सामील होता. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा (LeT) आणि हरकत-उल-जिहादी इस्लामी (HUJI) या दहशतवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू झाला आणि 62 हून अधिक जण जखमी झाले. ज्यामध्ये मेजर संदीप उन्नीकृष्णन, पोलिस दलातील तुकाराम ओंबळे, हेमंत करकरे, विजय साळस्कर आणि अशोक कामटे हे अधिकारी शहीद झाले होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+