मोठी बातमी! आता नवीन आधारकार्डवर तुमची वैयक्तिक माहिती दिसणार नाही! Aadhaar कसे डाऊनलोड करायचे? वाचा
New Aadhaar Card Design Privacy Update : भारत सरकारच्या आधार कार्डाच्या सुरक्षेसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा बदल लवकरच होणार आहे. या नवीन नियमानुसार, तुमच्या आधार कार्डावर आता तुमचे नाव, पत्ता आणि १२ अंकी आधार क्रमांक दिसणार नाही! भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण वैयक्तिक माहितीचा गैरवापर टाळण्यासाठी आणि ऑफलाइन पडताळणी थांबवण्यासाठी हे पाऊल उचलत आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत हा नवीन नियम लागू करण्याचे UIDAI चे लक्ष्य आहे.
नवीन नियमानुसार, आधार कार्डावरील माहिती अत्यंत गोपनीय ठेवली जाईल, ज्यामुळे कार्डचा दुरुपयोग करणे शक्य होणार नाही.

सध्याचे आधार कार्ड नवीन आधार कार्ड (प्रस्तावित)
फोटो, नाव, पत्ता, जन्मतारीख, १२ अंकी क्रमांक, QR कोड सर्व माहिती उपलब्ध. फक्त फोटो आणि QR कोड दिसेल.
उद्देश: ऑफलाइन पडताळणी सहज शक्य होते, ज्यामुळे डेटा चोरीचा धोका. उद्देश: वापरकर्त्याची गोपनीयता वाढवणे आणि केवळ 'वय' तपासणी जलद करणे.
UIDAI चे स्पष्टीकरण: UIDAI चे सीईओ भावेश कुमार यांनी घोषणा केली की, कार्डवर जास्त माहिती छापल्यास गैरवापराची शक्यता वाढते. त्यामुळे हॉटेल किंवा इतर कार्यक्रमाच्या आयोजकांनी आधार कार्डाची फोटोकॉपी जमा करणे (जे नियमांचे उल्लंघन आहे) थांबवण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे.
ऑफलाइन पडताळणीवर बंदी का?
आधार कायद्यानुसार, कोणत्याही संस्थेला ऑफलाइन पडताळणीसाठी व्यक्तीचा आधार क्रमांक किंवा बायोमेट्रिक डेटा जमा करणे, वापरणे किंवा साठवून ठेवण्यास मनाई आहे. तरीही अनेक ठिकाणी आधार कार्डाची फोटोकॉपी घेतली जाते, ज्यामुळे फसवणुकीचा धोका वाढतो. या बदलामुळे ऑफलाइन पडताळणी आपोआप थांबेल आणि डेटा सुरक्षित राहील.
नियमांचे उल्लंघन केल्यास १ कोटी दंड!
आधार पडताळणी करण्यासाठी धारकाची संमती आवश्यक आहे. बायोमेट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात (जसे की ओटीपी, फिंगरप्रिंट किंवा डोळ्याचा स्कॅन) संमती देणे बंधनकारक आहे. संमतीशिवाय पडताळणी करणाऱ्या कोणत्याही संस्थेवर १ कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो.
आधार कार्ड कसे डाउनलोड करावे?
नवीन आधार कार्ड किंवा तुमच्या सध्याच्या आधारची इलेक्ट्रॉनिक प्रत डाउनलोड करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
- सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर (uidai.gov.in) जा आणि 'माय आधार' (My Aadhaar) या विभागात 'आधार डाउनलोड करा' (Download Aadhaar) या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा १२ अंकी आधार क्रमांक किंवा नोंदणी आयडी किंवा व्हर्च्युअल आयडी प्रविष्ट करा.तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला सहा अंकी ओटीपी (OTP) भरा आणि 'सत्यापित करा आणि डाउनलोड करा' (Verify and Download) वर क्लिक करा.
- तुमचे e-Aadhaar पीडीएफ (PDF) स्वरूपात डाउनलोड होईल. फाईल उघडण्यासाठी तुम्हाला ८ अंकी पासवर्ड (तुमच्या नावाचे पहिले चार मोठे अक्षरे आणि त्यानंतर तुमचे जन्माचे वर्ष, उदा. SURE1990) टाकावा लागेल.
-
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा












Click it and Unblock the Notifications