Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

NEET Result 2025 : NEET UG मध्ये टॉपर ठरलेला राजस्थानचा महेश कुमार कोण आहे?, टॉप-10 विद्यार्थी लिस्ट

NEET UG Result 2025 Topper Rank- 1 Mahesh Kumar : राष्ट्रीय चाचणी संस्थेने (NTA) 14 जून रोजी NEET UG 2025 चा निकाल जाहीर केला आहे. उमेदवार neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचा निकाल तपासू शकतात. यासोबतच, निकाल विद्यार्थ्यांना ईमेलद्वारे देखील पाठवला जात आहे.

या वर्षी राजस्थानमधील हनुमानगड येथील रहिवासी महेश कुमारने ऑल इंडिया रँक -1 मिळवून पहिला क्रमांक पटकावला आहे. टॉपर महेश कुमार 99.999954 पर्सेंटाइल आहे. त्याला 720 पैकी 686 गुण मिळाले आहेत. त्याचे स्कोअरकार्ड व्हायरल होत आहे.

महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी भारतात तिसरा!

इंदूरचा उत्कर्ष अवधिया ९९.९९९९०९५ पर्सेंटाइलसह दुसरा क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीच्या मृणाल किशोर झा हिने चौथा क्रमांक मिळवला आणि अविका अग्रवाल हिने पाचवा क्रमांक मिळवला.

पहिल्या पाचमध्ये पहिल्या चार स्थानांवर मुले आहेत आणि एका मुलीने पाचवा क्रमांक मिळवला आहे. दिल्लीच्या विद्यार्थ्यांनी पहिल्या दहापैकी चौथा, पाचवा आणि नववा क्रमांक मिळवला.

neet ug result 2025

NEET UG 2025 टॉपर रँक-1: महेश कुमार कोण आहे?

महेश कुमार हा राजस्थानातील हनुमानगडचा रहिवासी आहे. त्याचा जन्म 03 ऑगस्ट 2008 रोजी झाला. तो सामान्य श्रेणीत परीक्षेत बसला होता. त्याच्या वडिलांचे नाव रमेश कुमार आणि आईचे नाव हेमलता भगवानी आहे.

NEET UG TOP 10 ची यादी खालीलप्रमाणे..!

  • महेश कुमार | पुरुष | सामान्य | 99.9999547 (टक्केवारी) | राजस्थान
  • उत्कर्ष अवधिया | पुरुष | सामान्य | 99.9999095 | मध्य प्रदेश
  • कृष्णा जोशी | पुरुष | सामान्य | 99.9998189 | महाराष्ट्र
  • मृणाल किशोर झा | पुरुष | सामान्य | 99.9998189 | दिल्ली (NCT)
  • अविका अग्रवाल | स्त्री | सामान्य | 99.9996832 | दिल्ली (NCT)
  • जेनिल विनोदभाई भयानी | पुरुष | सामान्य | 99.9996832 | गुजरात
  • केशव मित्तल | पुरुष | सामान्य | 99.9996832 | पंजाब
  • झा भव्य चिराग | पुरुष | सामान्य | ९९.९९९६३७९ | गुजरात
  • हर्ष केदावत | पुरुष | सामान्य | 99.9995474 | दिल्ली (NCT)
  • आरव अग्रवाल | पुरुष | सामान्य | 99.9995474 | महाराष्ट्र
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+