Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

NEET UG 2025 Result : 'नीट'चा निकाल लागला; आता निकाल कसा तपासायचा? सर्व माहिती एका क्लिकवर

NEET UG 2025 Result : देशात 4 मे रोजी झालेल्या नीट यूजी 2025 परीक्षेसाठी 23 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी सुमारे 20.8 लाख उमेदवारांनी परीक्षा दिली. आता नीट परिक्षेचा निकाल आज 14 जून 2025 रोजी जाहीर झाला आहे, परिक्षार्थ्यांना या निकालाची अपेक्षा होती.

दरम्यान, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) NEET UG 2025 चा निकाल कधीही जाहीर करू शकते, असे यापुर्वीच वनइंडियाने वृत्त दिले होते त्यानुसार, आता निकाल जाहीर झाला आहे, निकालासोबतच, अंतिम उत्तर की देखील वेबसाइटवर अपलोड केली जाईल. दोन्ही गोष्टी NEET च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असतील. यावेळी NEET UG परीक्षा 4 मे रोजी भारतातील 557 शहरांमध्ये आणि 14 परदेशी केंद्रांवर घेण्यात आली होती, ज्यामध्ये 20.8 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.

NEET UG 2025 Result

कुठे पाहणार निकाल?

4 मे रोजी झालेल्या नीट यूजी 2025 परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर प्रसिद्ध झाला आहे. हा निकाल neet.nta.nic.in या वेबसाइटवर प्रसिद्ध झाला असुन उमेदवार ते ऑनलाइन तपासू शकतील. निकालाची लिंक सक्रिय होताच, विद्यार्थी त्यांच्या अर्जाच्या तपशीलांच्या मदतीने स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतील.

NEET 2025 कसा तपासायचा निकाल?

  • प्रथम होमपेजवरील NEET UG 2025 निकालावर किंवा डाउनलोड स्कोअरकार्ड लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.
  • माहिती भरल्यानंतर, सबमिट वर क्लिक करा.
  • तुमचा स्कोअरकार्ड PDF फाइल स्क्रीनवर उघडेल.
  • तुमचे नाव, रोल नंबर आणि गुण काळजीपूर्वक तपासा.
  • स्कोअरकार्ड डाउनलोड करा आणि सेव्ह करा.

निकालानंतर समुपदेशन फेरी

निकाल जाहीर झाल्यानंतर, यशस्वी उमेदवारांना वैद्यकीय समुपदेशनासाठी उपस्थित राहावे लागेल. यामध्ये, उमेदवारांच्या रँक आणि त्यांनी दिलेल्या महाविद्यालय आणि अभ्यासक्रमाच्या पर्यायांवर आधारित, त्यांना MBBS, BDS, BHMS, BUMS सारख्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळेल.

NEET UG 2025 Result मार्कशीटमध्ये कोणते तपशील तपासावेत?

निकालानंतर मार्कशीटमध्ये उमेदवाराने आवश्यक माहिती तपासायला हवी.

  • नाव - रोल नंबर
  • अर्ज क्रमांक
  • भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रातील गुण
  • परसेंटाइल स्कोर

ऑल इंडिया रँक (AIR)

  • श्रेणी रँक (लागू असल्यास)
  • पात्रता स्थिती (उत्तीर्ण/अयशस्वी)
  • कट-ऑफ गुण

NEET 2025 कट-ऑफ काय आहे?

सामान्य श्रेणी : किमान 50 टक्के ओबीसी/एससी/एसटी: किमान 40 टक्के तुम्हाला हे देखील आवडेल "एअर इंडिया प्रवासी यादी: अहमदाबादमध्ये क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमान एआय-171 मधील प्रवाशांची यादी, तिथे कोण कोण होते?" कट-ऑफ अंतिम निकालासह जाहीर केला जाईल आणि उच्च गुणांच्या आधारे ठरवला जाईल.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+