NEET MDS Result 2025 : नीट-एमडीएस निकाल जाहीर, कसा चेक करायचा निकाल, जाणून घ्या प्रक्रिया
NEET MDS Result 2025 News In Marathi : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसच्या (NBEMS) वतीने, आज दि.15 मे वार गुरुवार रोजी NEET MDS 2025 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. हा निकाल जाहीर होताच, संबंधित परिक्षार्थींना दिलासा मिळाला आहे. नेमका हा निकाल कसा चेक करायचा जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया...!
परीक्षार्थी विद्यार्थ्यांना हा निकाल अधिकृत वेबसाइट natboard.edu.in वर पाहता येणार आहे. कारण, अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. उमेदवार त्यांच्या रोल नंबर आणि नोंदणी क्रमांकाद्वारे स्कोअरकार्ड तपासू शकतात. एकूण 30,435 उमेदवार या परीक्षेत यशस्वी झाले आहेत. ही परीक्षा 19 एप्रिल 2025 रोजी घेण्यात आली होती.

कट ऑफ पॉईंट काय असणार?
परीक्षेत यशस्वी झालेले उमेदवारांना आता मास्टर ऑफ डेंटल कोर्समध्ये प्रवेश घेता येणार आहे. NBEMS ने विविध श्रेणींसाठी अधिकृत स्कोअरकार्ड आणि कट-ऑफ गुण देखील जारी केले आहेत.
सामान्य आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गांसाठी कट-ऑफ 50 टक्के आहे. 960 पैकी 261 गुण आहेत. ओबीसी, एससी आणि एसटी वर्गांसाठी कट-ऑफ 40 वा टक्के आहे, जो 227 गुणांच्या समतुल्य असणार आहे.
नीट एमडीएस निकाल 2025, कसा चेक करायचा..!
- NBEMS ची अधिकृत वेबसाइट natboard.edu.in ला भेट द्या.
- या ठिकाणी NEET MDS 2025 निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
- स्क्रीनवर एक PDF दिसेल.
- आता येथे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
- नोंदणी क्रमांक इत्यादी प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
- स्क्रीनवर स्कोअरकार्ड दिसेल.
- आता तपासा आणि प्रिंटआउट घ्या.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढची प्रक्रिया कशी असणार आहे?
- परीक्षेत यशस्वी झालेले उमेदवार आता एमडीएस प्रवेशासाठी समुपदेशन प्रक्रियेत सहभागी होतील. समुपदेशन समिती (MCC) द्वारे आयोजित केले जाईल. समुपदेशन वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाऊ शकते.
- डेंटल कौन्सिल ऑफ इंडियाने यापूर्वीच पुष्टी केली आहे की, इंटर्नशिप पूर्ण करण्याची अंतिम तारीख 30 जून आहे. निकालाबाबत अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
- मास्टर ऑफ डेंटल सर्जरी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर दरवर्षी राष्ट्रीय परीक्षा मंडळ (NBE) कडून NEET MDS परीक्षा घेतली जाते. परीक्षेला बसण्यासाठी उमेदवाराकडे बीडीएस पदवी असणे बंधनकारक आहे.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications