Bijapur Naxal Attack : विजापूरमध्ये नक्षल्यांचा हल्ला, IED स्फोटात आर्मीचे वाहन उडवले, 9 जवान शहीद
Bijapur Naxal Attack : छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा स्फोट घडवून आणला. या हल्ल्यात दंतेवाडा डीआरजीचे 8 जवान शहीद झाले. तर एका चालकाचाही मृत्यू झाला आहे. बस्तर रेंजच्या आयजींनी या घटनेला दुजोरा दिला.
बस्तर रेंजचे आयजी सुंदरराज पी यांनी सांगितले की, विजापूरमधील संयुक्त ऑपरेशन दल ऑपरेशननंतर परतत होते. सोमवारी दुपारी 2.15 च्या सुमारास नक्षलवाद्यांनी आंबेली गावाजवळ IED स्फोट घडवून आणला.
कुत्रु पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आंबेली गावाजवळ ही घटना घडली. या घटनेनंतर सुरक्षा दलाकडून परिसरात शोधमोहीम राबविण्यात येत आहे. माओवाद्यांच्या या हल्ल्याबाबत प्रशासन आणि सुरक्षा दलांमध्ये तीव्र नाराजी आहे.

सुमारे 30 फूट उंच वाहन फेकले गेले
मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाचे एक वाहन कुत्रूच्या दिशेने जाणार असल्याची माहिती नक्षलवाद्यांना मिळाली होती. याआधीही त्यांनी घाताची तयारी केली होती. वाहन जवळ येताच नक्षलवाद्यांनी शक्तिशाली IED स्फोट केला, ज्यामुळे पोलिस पिकअप वाहन 20 ते 30 फूट उंच वरती फेकले गेले.
डीजीपी बैठक सोडून विजापूरला रवाना झाले
स्फोटानंतर घातपात बसलेल्या नक्षलवाद्यांनीही वेगाने गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात 8 जवान आणि वाहन चालक शहीद झाले. घटनेची माहिती मिळताच बस्तरचे आयजी सुंदरराज विजापूरला रवाना झाले. त्याचवेळी रायपूरचे डीजीपी अशोक जुनेजा हेही एक महत्त्वाची बैठक सोडून हेलिकॉप्टरने बस्तरला रवाना होत आहेत.












Click it and Unblock the Notifications