Navratri maha Ashtami 2025 :आज महाअष्टमी 'या' शुभ मुहूर्तावर करा हवन आणि कन्या पूजन; जाणून घ्या विधी
Navratri maha Ashtami 2025 Havan and Kanya Pujan Today Shubh Muhurat time Vidhi : शारदीय नवरात्रीचा आज आठवा दिवस - महाअष्टमी! नवरात्रीत अष्टमीला खूप महत्व आहे अनेक ठिकाणी या दिवसाला महाअष्टमी किंवा दुर्गाअष्टमी म्हटले जाते. या दिवशी होम हवन सर्वत्र केला जातो. यज्ञ कार्य हा एक धार्मिक कार्य आणि रितीरिवाज आहे या दिवशी हे कार्य तसेच अष्टमी आणि नवमीला कन्या पुजन केले जाते.
या मंगलदिनी देवी दुर्गेच्या आठव्या स्वरूपाची, 'माँ महागौरी'ची विशेष पूजा केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार, महाअष्टमीचे पूजन, व्रत आणि हवन केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी नांदते. शक्ती साधना आणि देवी उपासनेसाठी अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या या तिथीचे शुभ मुहूर्त, अचूक पूजा विधी आणि कन्या पूजनाचे महत्त्व जाणून घेऊया.

महाअष्टमी २०२५: हवन आणि पूजनाचे शुभ मुहूर्त
विधी, मुहूर्ताची वेळ
- अभिजीत मुहूर्त ३० सप्टेंबर, सकाळी ११:४७ ते दुपारी १२:३५ पर्यंत
- कन्या पूजनाचा शुभ मुहूर्त ३० सप्टेंबर, सकाळी १०:४० ते दुपारी १२:१० पर्यंत
- हवन करण्याचा उत्तम काळ कन्या पूजनानंतर आणि नवमी तिथीच्या समाप्तीपूर्वी
महाअष्टमीची पूजा आणि हवन विधी
पूजा विधी
- सकाळी स्नान करून पूजा स्थळ स्वच्छ करा. देवी महागौरीच्या प्रतिमेला किंवा चित्राला फुले, वस्त्र आणि दागिन्यांनी सजवा.
- देवीला लाल, गुलाबी किंवा पांढरी फुले, अक्षत, रोळी, चंदन, दीप आणि धूप अर्पण करा.
- नारळ आणि पांढरी वस्त्रे देवीला अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते.
- या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पाठ किंवा देवी कवच/अष्टमी मंत्राचा जप करणे विशेष फलदायी ठरते.
- पूजन झाल्यावर कन्यांना भोजन (कन्या पूजन) आणि उपहार देऊन त्यांचे आशीर्वाद घ्या.
हवन विधी
- महाअष्टमीच्या दिवशी हवन (यज्ञ) केल्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते.
- पूजन झाल्यावर हवनाची तयारी करा. आंब्याचे, पिंपळाचे किंवा पळसाचे लाकूड वापरा.
- 'ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे' या मंत्राने हवन करा.
- प्रत्येक आहुतीसोबत तूप (घी), गूळ, तीळ आणि लाकडाचा वापर करा.
- हवनाच्या शेवटी पूर्णाहुती देऊन देवीची आरती करा.
कन्या पूजनाचे महत्व
- महाअष्टमी आणि नवमी तिथीला कन्या पूजनाला (कुमारी पूजन) विशेष महत्त्व आहे. कन्यांमध्ये देवी दुर्गा साक्षात वास करते, अशी श्रद्धा आहे. या दिवशी दान आणि कन्या पूजन केल्याने जीवनातील दारिद्र्य आणि कष्ट मिटतात.
- शास्त्रानुसार, २ वर्षांच्या कन्येला 'कुमारी' आणि १० वर्षांच्या कन्येला 'सुभद्रा' म्हटले जाते.
- कन्या पूजनावेळी त्यांना वयानुसार 'त्रिमूर्ती, कल्याणी, रोहिणी, काली, चंडिका, शांभवी, दुर्गा' अशी नावे दिली जातात.












Click it and Unblock the Notifications