Navratri 2025 : यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करायचा? जाणून घ्या महत्त्व अन् 9 रंगांची यादी
Navratri 2025 - 9 Day and 9 Colors Details in Marathi : शारदीय नवरात्री हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण असून, या नऊ दिवसांच्या उत्सवात दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.
या काळात प्रत्येक दिवसासाठी एक विशिष्ट रंग ठरलेला असतो. हे रंग केवळ परंपरा नसून, त्यांचे आध्यात्मिक महत्त्वही आहे.
हे रंग देवीच्या विशिष्ट गुणांचे आणि शक्तीचे प्रतीक मानले जातात. असे मानले जाते की या नऊ दिवसांमध्ये त्या त्या दिवशी त्या त्या रंगाचे कपडे परिधान केल्याने देवीचा विशेष आशीर्वाद मिळतो. चला तर यंदाच्या नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणता रंगाचे कपडे परिधान करावे व त्याचे महत्त्व काय आहे...!

नवरात्रीतील नऊ रंगांचे महत्त्व
नवरात्रीत नऊ रंगांचे कपडे परिधान करण्याची प्रथा अलीकडच्या काही वर्षांत लोकप्रिय झाली असली तरी, ती महिलांमध्ये विशेष उत्साह निर्माण करते. स्त्रीशक्तीचा सन्मान करण्यासाठी आणि देवीच्या प्रत्येक रूपाला आदराने गौरवण्यासाठी हे रंग वापरले जातात. यातील प्रत्येक रंग एक विशिष्ट ऊर्जा आणि भावना दर्शवतो.
हे ही वाचा : Shardiya Navratri 2025 : घटस्थापना का केली जाते? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पद्धत अन् त्याचे महत्त्व!
नवरात्री 2025 मध्ये कोणत्या दिवशी कोणता रंग असेल?
नवरात्री 2025 : दिवसानुसार रंगांची यादी आणि त्यांचे महत्त्व
22 सप्टेंबर, सोमवार - पांढरा रंग
- देवीचे रूप: शैलपुत्री
- महत्त्व: पांढरा रंग निरागसता, शांतता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. या रंगाचे कपडे परिधान केल्याने मन शांत आणि निर्मळ राहते.
23 सप्टेंबर, मंगळवार - लाल रंग
- देवीचे रूप: ब्रह्मचारिणी
- महत्त्व: लाल रंग प्रेम, उत्साह, आणि शक्तीचे प्रतीक आहे. हा रंग शुभ मानला जातो आणि यामुळे व्यक्तीमध्ये ऊर्जा निर्माण होते.
24 सप्टेंबर, बुधवार - निळा रंग
- देवीचे रूप: चंद्रघंटा
- महत्त्व: निळा रंग ऊर्जा, विश्वास आणि स्थिरतेचे प्रतीक आहे. या रंगाचा वापर केल्याने मनाला शांती मिळते.
हे ही वाचा : Navratri Fasting 2025 : नऊ दिवसांच्या उपवासात काय खावे आणि काय खाऊ नये, जाणून घ्या सविस्तर!
25 सप्टेंबर, गुरुवार - पिवळा रंग
- देवीचे रूप: कुष्मांडा
- महत्त्व: पिवळा रंग आनंद आणि उत्साहाचे प्रतीक आहे. हा रंग व्यक्तीच्या जीवनात सकारात्मकता आणतो.
26 सप्टेंबर, शुक्रवार - हिरवा रंग
- देवीचे रूप: स्कंदमाता
- महत्त्व: हिरवा रंग निसर्ग, वाढ आणि मायेचे प्रतीक आहे. हा रंग समृद्धी आणि नवीन सुरुवात दर्शवतो.
27 सप्टेंबर, शनिवार - राखाडी रंग
- देवीचे रूप: कात्यायनी
- महत्त्व: राखाडी रंग स्थिरता आणि शिस्तबद्धतेचे प्रतीक मानला जातो. हा रंग तटस्थता दर्शवतो.
28 सप्टेंबर, रविवार - नारिंगी रंग
- देवीचे रूप: कालरात्री
- महत्त्व: नारिंगी रंग शांतता, ज्ञान आणि उत्साहाचे प्रतीक आहे. हा रंग सकारात्मक ऊर्जा देतो.
29 सप्टेंबर, सोमवार - मोरपंखी रंग
- देवीचे रूप: महागौरी
- महत्त्व: मोरपंखी रंग वाढ आणि समृद्धीचे प्रतीक आहे. हा रंग नवीन आशा आणि प्रगती दर्शवतो.
30 सप्टेंबर, मंगळवार - गुलाबी रंग
- देवीचे रूप: सिद्धीदात्री
- महत्त्व: गुलाबी रंग प्रेम, जिव्हाळा आणि भावनेचे प्रतीक आहे. हा रंग शांतता आणि सौहार्द दर्शवतो.
या नऊ रंगांच्या माध्यमातून नवरात्रीचा उत्सव अधिक रंगतदार आणि उत्साही बनतो. महिला मोठ्या उत्साहाने हे रंग परिधान करून देवीची पूजा करतात आणि गरबा-दांडियाचा आनंद घेतात.












Click it and Unblock the Notifications