Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी अन् राहुल गांधींना न्यायालयाची नोटीस

National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणात मोठी बातमी आता समोर आली आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि काँग्रेसचेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहूल गांधी यांना न्यायालयाने नोटीस बजावली आहे.

दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने गुरुवारी ही नोटीस बजावली आहे. यामध्ये इतर प्रस्तावित आरोपींनाही नॅशनल हेराल्ड प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेण्याच्या प्रश्नावर सुनावणीसाठी नोटीस बजावली.

National Herald case

दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने गुरुवारी माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि तर प्रस्तावित आरोपींना त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेण्याच्या प्रश्नावर सुनावणीसाठी नोटीस बजावली आहे.

Take a Poll

काय म्हणाले कोर्ट?

न्यायालयाने असे म्हटले की आरोपपत्रातील त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत आणि सध्याचा मुद्दा हा आहे की भारतीय नागरिक सुरक्षा संहिताच्या (बीएनएसएस) कलम 223 अंतर्गत नोटीस बजावली पाहिजे का? असा सवाल कोर्टाने व्यक्त केला होता.

25 एप्रिल रोजी कोर्टात सुनावणीवेळी काय झाले होते?

दरम्यान यापुर्वी 25 एप्रिल रोजी नॅशनल हेराॅल्ड मनी लाँड्रिग प्रकरणी दिल्लीच्या न्यायालयात सुनावणी झाली होती.नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस खासदार सोनिया गांधी आणि राहुल गांधी आणि इतरांना मोठा दिलासा दिला होता, आण दिल्ली न्यायालयाने सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांना नोटीस बजावण्यास नकार दिला होता, त्यानंतर आज 2 मे रोजी या प्रकरणी सुनावणी झाली.

न्यायालयाने आरोपपत्रात गहाळ कागदपत्रे असल्याचे नमूद करत ईडीला नॅशनल हेराॅल्ड प्रकरणात अधिक संबंधित कागदपत्रे आणण्यास आणि त्यातील कमतरता दूर करण्यास सांगितले होते. त्यानुसार, ईडीने आज या प्रकरणातील कमतरता दूर केल्या. त्यानंतर कोर्टाने राहुल गांधी आणि सोनिया गांधींना नोटीस बजावली.

नॅशनल हेराल्ड प्रकरण काय आहे?

  • नॅशनल हेराल्ड प्रकरणात आर्थिक अनियमितता आणि मनी लाँड्रिंगचे आरोप झाले आहेत. दिल्लीतील महत्वाचे हेराल्ड हाऊस ताब्यात घेण्याच्या उद्देशाने यंग इंडियन लिमिटेड द्वारे असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडचे अधिग्रहण केल्याचा आरोप सुब्रम्हण्यम स्वामी यांनी अनेक काँग्रेस नेत्यांवर केला होता.
  • दरम्यान सुब्रम्हण्यम स्वामी यांनी 2012 साली एक याचिका कोर्टात दाखल केली आणि या याचिकेत काँग्रेस नेत्यांवर आरोप केला होता.
  • जवाहरलाल नेहरू यांनी 1938 मध्ये स्थापन केलेले नॅशनल हेराल्डची मूळ कंपनी एजेएल आहे. या वादाचे मुळ यंग इंडियन लिमिटेड (YIL) भोवती फिरते, ही कंपनी 2010 मध्ये स्थापन झाली आणि सोनिया गांधी आणि राहुल गांधी या मायलेकाचे त्यात प्रत्येकी 38 टक्के शेअर्स होते.
  • या कंपनीची स्थापना 5 लाख रुपयांच्या भांडवलातून झाली आणि त्यानंतर लवकरच, कंपनीने काँग्रेस पक्षाला दिलेले कर्ज ताब्यात घेऊन एजेएलमधील 99 टक्के हिस्सा विकत घेतला आणि एजेएलच्या मालमत्तेवर कोणतेही शुल्क न घेता प्रभावीपणे नियंत्रण मिळवले असा आरोप आहे.
  • दरम्यान, हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर सत्र न्यायालयाने आयकर विभागाला नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र आणि गांधी कुटुंबाच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची परवानगी दिली.
  • नंतर हे प्रकरण सक्तवसुली संचालनालयाकडे सोपवण्यात आले. या प्रकरणी आज न्यायालयाने राहूल गांधी आणि सोनिया गांधींना नोटीस पाठवली आहे.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+