मोठी बातमी! राष्ट्रीय मागासवर्ग आयोग सरकारकडे करणार शिफारस, 'या' जाती येणार केंद्रीय OBC यादीत!
National Commission for Backward Classes :राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने काही विशिष्ट जातींचा केंद्रीय ओबीसी यादीत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.तशी शिफारसही केंद्र सरकारकडे राष्ट्रीय मागासवर्ग आयोग करणार आहे. मागासवर्ग आयोगाने 17 ऑक्टोबर 2023 आणि 26 जुलै 2024 रोजी मुंबई येथे जनसुनावणी घेतली. राज्य सरकारने सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली. त्यानंतर आता केंद्रीय सुचीत समावेशासाठी आयोग शिफारस करणार आहे.
सर्व कागदपत्रे आढळली योग्य
राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला महाराष्ट्र सरकारकडून जातींचा केंद्रीय यादीत समावेश करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला होता. आयोगाने 17 ऑक्टोबर 2023 आणि 26 जुलै 2024 रोजी मुंबई येथे जनसुनावणी घेतली. राज्य सरकारने सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली. आयोगाला सर्व कागदपत्रे बरोबर असल्याचे आढळून आले आहेत.

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्राकडे शिफारस
राष्ट्रीय मागासवर्ग खालील जातींचा ओबीसी यादीत समावेश करण्यासंबंधी केंद्र सरकारकडे शिफारस करत आहे.
- कुलवंत वाणी
- कु. वाणी,
- वाणी (कुलवंत)
- कुलवंत-वाणी
- कुणबी वाणी
- कराडी
- कानोडी / कानडी
- नेवेवाणी
- सलमानी
- निषाद
- मल्ल
- मल्लाह,
- नाविक












Click it and Unblock the Notifications