दिवाळीपूर्वीच कामगारांसाठी मोदी सरकारची मोठी भेट; दर महिन्याला मिळणार 26 हजार,जाणून घ्या ते कसे?
Modi Govt Minimum Wage Hike : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या वतीने नुकताच मोठा निर्णय घेण्यात आला आहे.यामध्ये प्रामुख्याने देशभरातील कामगारांना यंदाची दिवाळी अगदी आनंदात जाणार आहे. मुळात, केंद्र सरकारने कामगारांसाठी परिवर्तनीय महागाई भत्ता (Variable Dearness Allowance) म्हणजेच VDA मध्ये सुधारणा केली आहे. यात कामगारांना देण्यात येणारा किमान वेतन दर 1,035 रुपये प्रतिदिन करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर दर महिन्याला कामगारांच्या हातात किती पैसे येतील, याची उत्सुकता लागली आहे. चला तर जाणून घेऊया, यामागील सर्व गणित.

अकुशल कामगारांना किती मिळणार पैसे?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने मोठी घोषणा केली आणि कामगारांच्या किमान वेतनात लक्षणीय वाढ केली. पीटीआय वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, कामगार मंत्रालयाने सांगितले की, या निर्णयाचा उद्देश जगण्याच्या वाढत्या खर्चाच्या दरम्यान कामगारांना मदत करणे आहे.
किमान कामगार दरातील नवीनतम झालेल्या संशोधनानुसार, बांधकाम, साफसफाई, अनलोडिंग आणि लोडिंग यांसारख्या अकुशल कामगारांसाठी सेक्टर A मधील किमान वेतन दर 783 रुपये प्रतिदिन झाला आहे आणि जर तसे गणित केले. तर आता या अकुशल कामगारांना दर महिन्याला 20,358 रुपये मिळतील.
या कामगारांना महिन्याकाठी 26 हजार मिळणार
जर आपण कुशल कामगार, कारकून आणि नि:शस्त्र वॉचमन किंवा रक्षक यांच्याबद्दल बोललो तर त्यांचे किमान वेतन 954 रुपये प्रतिदिन करण्यात आले आहे. त्यानुसार त्यांचे मासिक मानधन आता 24,804 रुपये प्रति महिना असेल. उच्च कुशल कामगारांना आता दरमहा 26,910 रुपये मिळणार असून, त्यांचे किमान वेतन प्रतिदिन 1035 रुपये करण्यात आले आहे.
कामगारांच्या किमान वेतनात वाढ केल्याची घोषणा केल्यानंतर वाढीव दरांची अंमलबजावणी केव्हा होणार, याबाबत कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कामगारांच्या विशेषत: कामगारांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत.
एप्रिल महिन्यात यात बदल होण्याची शक्यता
असंघटित क्षेत्रात, त्यांच्या उपजीविकेच्या दृष्टीने, VDA मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. कामगारांसाठीचे नवे दर पुढील महिन्याच्या पहिल्या महिन्यापासून, 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होतील आणि त्यांना एप्रिल 2024 पासून लाभ दिले जातील. या वर्षातील ही दुसरी दुरुस्ती आहे, याआधी एप्रिल महिन्यात हा बदल करण्यात आला होता.












Click it and Unblock the Notifications