हिंदूवरील अत्याचाराबाबत मोहन भागवत सडेतोड बोलले, म्हणाले, आता...

नागपूर : आपण दुर्बल आहोत, असंघटीत आहोत, याचा अर्थ आपण आत्याचाराला निमंत्रण देत आहोत. त्यामुळे संघटीत रहा, असे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला आज शंभर वर्षं पूर्ण होत असून यानिमित्ताने नागपुरात दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात आज वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. त्यात स्वयंसेवकांना संबोधीत करताना सरसंघचालक मोहन भागवत बोलत होते.

जगाच्या विकासाचा विचार फक्त भारताचा

मोहन भागवत यांनी भारताची वाटचाल व जागतिक स्तरावरील आव्हानं याबाबत भाष्य केलं. ते म्हणाले, भारताला रोखण्याचा प्रयत्न काही देश करत आहेत. भारत पुढे जाऊ नये, अशी अनेक देशांची इच्छा आहे. या इच्छेचा विरोध होईल, अशीच अपेक्षा आहे. भारताचे दुश्मन वेगवेगळ्या चाली खेळतील. पण आपण हे आव्हान स्विकारलं पाहिजे. संघटीत व्हायला पाहिजे. आजतागायत भारत सोडून इतर कोणत्या देशानं जगाच्या विकासाचा मार्ग निवडलेला नाही. आपण तो निवडलाय, असं भागवत यांनी स्पष्ट केलं.

RSS Chief Mohan Bhagwat

बांग्लादेशात हिंदूवर अत्याचार

ते म्हणाले, "इतर देशांमध्ये विध्वंस घडवून आणणं, तिथली सरकारं पाडणं, या गोष्टी घडत आहेत. आपल्या शेजारी बांगलादेशात काय घडलं..? त्याची काही तात्कालिक कारणं असतील. पण एवढा मोठा विद्ध्वंस तेवढ्यानं होत नाही. त्या विद्ध्वंसामुळे हिंदू समाजावर अत्याचाराच्या घटनेची पुनरावृत्ती झाली. कुठे काही गडबड झाली, की दुर्बलांवर राग काढला जातो. दुर्बलांना ठोकण्याची कट्टरपंथीयांची वृत्ती आहे. ही वृत्ती जोपर्यंत तिथे आहे, तोपर्यंत हिंदूच नव्हे, सर्वच अल्पसंख्यकांच्या डोक्यावर अत्याचाराची टांगती तलवार कायम राहणार आहे", असं म्हणत मोहन भागवतांनी एकत्र राहण्याचं आव्हान केलं.

हिंदूंना संघटीत होण्याचे आव्हान

मोहन भागवतांनी आपल्या भाषणातून हिंदूंना एकत्र येण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, बांग्लादेशातील हिंदूंना आपल्या मदतीची गरज आहे. जगभरातल्या हिंदूंच्या मदतीची गरज आहे. दुर्बल राहणं अपराध आहे, हे हिंदूंच्या लक्षात यायला हवं. आपण दुर्बल, असंघटित आहोत याचा अर्थ आपण अत्याचाराला निमंत्रण देत आहोत. आपण दुर्बल आहोत हेच अत्याचार-अन्यायाचं निमित्त आहे. त्यामुळे जिथे आहात, तिथे संघटित राहा. कुणाशी शत्रुत्व करू नका. हिंसा करू नका." असं आवाहन मोहन भागवतांनी केलं.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+