Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी : म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; चेन्नईजवळ घडला भीषण अपघात

Mysore-Darbhanga Express train collides with goods train near Chennai : रेल्वे अपघातासंदर्भातील देशातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. या अपघातात दोन डब्बे रुळाखाली घसरले असून काही डब्ब्याला आग लागली आहे. तर अनेक जण जखमी असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हैसूर ते दरभंगा भागमती एक्स्प्रेस ट्रेनची चेन्नईजवळील कावराईपेट्टई रेल्वे स्थानकाजवळ मालवाहू ट्रेनला जोरदार धडक बसली आहे. यात मोठे नुकसान झाले. एक्सप्रेसमधील काही प्रवासी जखमी असल्याचे देखील सांगण्यात आले. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वैद्यकीय मदत आणि बचाव पथक चेन्नई सेंट्रल दक्षिण रेल्वेवरून पाठवण्यात आले. या ठिकाणी रात्री उशीरापर्यंत मदत कार्य सुरू होते.

Mysore-Darbhanga Express train

दोन डब्बे रुळावरुन घसरले, आग लागली

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मालगाडी कावराईपेट्टई रेल्वे स्थानकावर उभी असताना पॅसेंजर ट्रेनला धडक बसली. एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले असून त्यांना आग लागली आहे. रुग्णवाहिका आणि बचाव पथक घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. तर यात काही लोक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलिस व रेल्वे पोलिस घटनास्थळी दाखल झालेले आहेत. त्यांच्याकडून बचाव कार्य केले जात आहे.

रेल्वे अपघातावरुन विरोधकांचा सरकारवर निशाणा

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ट्रेन अपघाताच्या घटना समोर येत आहेत. तर रेल्वे प्रशानसाच्या वतीने त्याबाबत म्हणाव्या तश्या उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यापूर्वी देखील रेल्वे रुळावर सिलिंडर ठेवण्याचे प्रकार सातत्याने घडल्या आहेत. रेल्वे अपघात घडवण्यामागे षडयंत्र रचल्या जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला गेला. दुसरीकडे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सातत्याने उपाययोजना केल्या जात असल्याचा दावा केला जात आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+