10 दिवसांत राजीनामा द्या नाही तर बाबा सिद्दीकींप्रमाणेच मारून टाकू', 'मुख्यमंत्री योगींना धमकी

UP CM Yogi Adityanath: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. 10 दिवसात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा न दिल्यास बाबा सिध्दीकी यांच्याप्रमाणे हत्या केली जाईल, असा धमकीचा मेसेज शनिवारी संध्याकाळी मुंबई पोलिसांना मिळाला आहे. मुंबई पोलिसांनी अज्ञातविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

UP CM Yogi Adityanath

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 10 दिवसांत राजीनामा न दिल्यास राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्याप्रमाणे त्यांची हत्या केली जाईल, असा धमकीवजा संदेश म्हटलं आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला एका अनोळखी क्रमांकावरून हा संदेश आला आहे. हा मेसेज कोणी पाठवला याचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या संदेशानंतर मुख्यमंत्र्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. धमकीचा संदेश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री योगी यांची सुरक्षा व्यवस्था अलर्टवर आहे. या मेसेजचा तपशीलही मुंबई पोलिसांनी यूपी पोलिसांना पाठवला आहे. मुंबई पोलिसांकडून इनपुट मिळाल्यानंतर यूपी पोलिसही तपासात गुंतले आहेत.

12 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर फटाके फोडत असताना बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी याच्या कार्यालयाबाहेर तीन जणांनी त्यांची गोळ्या हत्या करण्यात आली होती. तसेच बॉलीवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देत ​​दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आहे.

मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ स्टार प्रचारक

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. मागील दोन दिवसापासून सर्वच राजकीय पक्षांच्या सभांना सुरुवात झाली आहे. प्रचारासाठी अत्यंत कमी दिवस राहिले आहेत. त्यामुळे भाजपाकडून स्टार प्रचारकाची यादी जाहीर करण्यात आली आहे. या स्टारप्रचारकाच्या यादीत उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांचे नाव आहे. मुख्यमंत्री योगी यांच्या महाराष्ट्रात ही प्रचाराच्या सभा आहेत. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+