Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोहर्रम म्हणजे काय? कोणाच्या आठवणीत होतो शोक ?

Muharram Date 2024 : इस्लाम हा जगातल्या सर्वात मोठ्या धर्मापैकी एक आहे. जगभरात अनेक देश मुस्लीमबहुल आहेत. प्रेषित मोहम्मद हे या धर्माचे संस्थापक असून कुराण हा इस्लामचा धर्मग्रंथ आहे. मक्का, मदिना ही मुस्लीम बांधवांची पवित्र स्थळे आहेत.

Muharram

मुस्लीम बांधवांसाठी मोहर्रम हा अत्यंत महत्वाचा महिना आहे. इस्लामी कॅलेंडरचा हा पहिला महिना. मुस्लीम नववर्ष 7 जुलैला सुरु झालं. मोहर्रमच्या दिवशी काही मुस्लीम बांधव शोक व्यक्त करतात. शोक व्यक्त करणा-यांना शिया मुस्लीम असं म्हणतात. प्रेषित मोहंमद पैगंबर यांचे नातू इमाम हुसेन यांच्या हौतात्म्याचा शोक शिया बांधवांकडून व्यक्त करण्यात येतो. करबला येथे झालेल्या लढाईत त्यांना हौतात्म्य आले होते.

मुस्लीम बांधवांसाठी हा महिना अत्यंत महत्वाचा महिना आहे. याच महिन्यात युनूस अ. स. यांना माशाच्या पोटातून बाहेर पडण्याचा आदेश अल्लाहने दिला होता. याच महिन्यात मुसा आणि इस्त्रायली यांना फिरौनपासून मुक्ती मिळाली होती.

शिया बांधव शोक का करतात?

मुस्लीम बांधवांत करबलाच्या लढाईला अत्यंत महत्व आहे. या लढाईत प्रेषित मोहंमद यांचे नातू इमाम हुसेन हुतात्मे झाले. त्यांच्या बरोबर त्यांचे काही सहकारी होते. ही लढाई प्रदीर्घ काळ चालली होती. इमाम हुसेन यांच्याशी आपल्या पूर्वजांचा संबंध आहे अशी शिया बांधवांची धारणा आहे. आम्ही नव्हतो, म्हणून हुसेन यांना हौतात्म्य आले, असा समज आहे. शोक करुन शिया बांधव क्षमायाचना करतात. 10 दिवस त्यांचा शोक सुरु असतो.मोहर्रमपासून मुस्लीम नववर्ष सुरु होते. मुस्लीम नववर्षाला हिजरी वर्ष म्हणतात. हिजरी वर्षाचे 355 दिवस असतात.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+