Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Mothers day 2025 Wishes : "आई श्वास अन् जगण्याचा विश्वास.." 'मदर्स डे'साठी 15 खास शुभेच्छा संदेश

Mother's Day Wishes 2025 in Marathi : आई ही आपल्या आयुष्याची पहाट अन् तीच आपल्या जगण्याची वाट.. आई या दोन अक्षरात जग सामावलेलं आहे. आपण जेव्हा जन्मतो तेव्हा आणि आपल्याला जेव्हा बोलायला येतं तेव्हा आपण सर्वात पहिला शब्द उच्चारतो तो आई...या शब्दातच एवढं सामर्थ्य आहे की, ते आयुष्यभर पुरतं..म्हणूनच जग जोपर्यंत आहे, तोपर्यंत आईचा महिमा कायमच राहणार...

आपल्या आयुष्यातील सर्वात महान आणि आपल्यासाठी सर्वात लहान होणारी आईच असते... यंदा मदर्स डे 11 मे 2025 रोजी रवीवारी येत आहे. आईबद्दलची थोरवी आणि तिच्यामुळेच आपण आहोत ही गोष्ट खास शुभेच्छा संदेशांद्वारे तुम्ही सांगू शकता. त्यासाठीच आईसाठी मराठीतील खास शुभेच्छासंदेश आपल्यासाठी देत आहोत.

Mothers day 2025 Wishes

आईसाठी शुभेच्छासंदेश (Mothers day 2025 Wishes in marathi)

1. आपल्या आयुष्यातील सर्वात महान आणि आपल्यासाठी सर्वात लहान होणारी आईच असते.

'मदर्स डे'च्या हार्दिक शुभेच्छा

2. देवाला पाहिले नाही आम्ही पण देवाची गरज काय ए आई तुझ्या चेहऱ्यापेक्षा वेगळा देवाचा चेहरा दुसरा कोणताच नाही...

'मदर्स डे'च्या हार्दिक शुभेच्छा!

3. देव जरी मज कधी भेटला माग हवे जे माग म्हणाला तर म्हणेल मी माझी आई सात जन्मी मला पुन्हा दे...

'मदर्स डे'च्या हार्दिक शुभेच्छा!

4. जीवनात आई ही अशी व्यक्ती असते की, तुम्ही कितीही स्वार्थीपणे वागा ती तुमच्याशी निस्वार्थपणेच वागते. तिला कशाचीच गरज नसते शिवाय तुमच्या...

'मदर्स डे'च्या हार्दिक शुभेच्छा!

Mothers day 2025 Wishes

5. आई...या शब्दातच एवढं सामर्थ्य आहे की, ते आयुष्यभर पुरतं..

'मदर्स डे'च्या हार्दिक शुभेच्छा!

6. आई तुझे थोर उपकार जन्म दिला आम्हांसी घडवले मातीतून मोती..

'मदर्स डे'च्या हार्दिक शुभेच्छा!

7. या जगात चंद्र-सूर्यापेक्षाही मोठी गोष्ट काय असेल तर ती आई अन् तिची माया..!

'मदर्स डे'च्या हार्दिक शुभेच्छा!

8. आई खरंच दुधाची साय असते जी आपल्या मुलांचं नेहमी संरक्षण करते, साईसारखं तिचं मऊ आणि शुद्ध प्रेम असतं.

'मदर्स डे'च्या हार्दिक शुभेच्छा!

9. आई...
श्वासही तू
आसही तू
जगण्याचा विश्वासही तू!

'मदर्स डे'च्या हार्दिक शुभेच्छा!

Mothers day 2025 Wishes

10. चालताना लेकराच्या पायाला ठेच जरी लागली ना..त्रास ज्याच्या काळजात होतो ती असते आई..

11. मुलांना घास भरवून उपाशी राहणारी फक्त आईच असते..मुलांनी खाल्लं तर तिचं पोट भरतं एवढा निस्वार्थपणा जगात फक्त एकाच माऊलीत ती म्हणजे आई

'मदर्स डे'च्या हार्दिक शुभेच्छा!

12. स्वःत झिजून मुलांचे भविष्य घडवण्यासाठी जी आयुष्यभर कष्ट उपसते ती आई..मुलांना मिळणारे यश हीच ती कमाई मानते अशा थोर आईला 'मदर्स डे'च्या हार्दिक शुभेच्छा!

13. आईचा पदर हा आभाळाएवढा असतो
आईचा मायेने फिरवलेला हात हा जगातील सर्वात शक्तिशाली हात असतो.

'मदर्स डे'च्या हार्दिक शुभेच्छा!

14. आई हे दोन अक्षरी नाव पण या दोन अक्षरात जग सामावलेलं असतं...

'मदर्स डे'च्या हार्दिक शुभेच्छा!

15. आपल्याला जेव्हा बोलायला येतं तेव्हा पहिला शब्द असतो तो आई..आई हा शब्द आपण आयुष्यात सर्वात जास्त बोलतो कारण ती नाळ आयुष्यभराची असते.

'मदर्स डे'च्या हार्दिक शुभेच्छा!

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+