Mothers day 2025 : 'मदर्स डे'निमित्त प्रेमरुप आईचा गौरव करा, हे 4 खास भाषणं तुमच्यासाठी,..
Mothers day 2025 short Speeches in marathi : स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे उगाच म्हटले जात नाही. आई दोन अक्षरात जग सामावलेलं आहे. आपण जेव्हा जन्मतो तेव्हा आणि आपल्याला जेव्हा बोलायला येतं तेव्हा आपण सर्वात पहिला शब्द उच्चारतो तो आई...या शब्दातच एवढं सामर्थ्य आहे की, ते आयुष्यभर पुरतं. ती जन्माची शिदोरी असते, तिचं असणं सर्वस्व मिळाल्यासारखं असतं अन् ती जेव्हा नसते तर काळजाचं पाणी व्हावं अन् जगण्यातला अर्थ निघून जावा अशीच गोष्ट आहे.
या जगात जोपर्यंत चंद्र-सूर्य तारे असतील तोपर्यंत आईचा अगाध महिमा कायम राहील. आईसाठी कितीही कविता लिहा अन् ग्रंथही लिहा पण आईसाठी शब्दही कमी पडेल.. एवढे तिचे महत्व आहे. आपल्या आयुष्यातील सर्वात महान आणि आपल्यासाठी सर्वात लहान होणारी आईच असते... अशा आईबद्दलची थोरवी आणि तिच्यामुळेच आपण आहोत ही गोष्ट लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही तुम्हाला आईबद्दल छोटेखानी भाषणं देत आहोत. ही भाषणं तुम्ही तुमच्या शाळा, महाविद्यालयं आणि मित्रांसमोर देऊ शकता. तसेच ही भाषणं वाचून सोशल मीडियावरही त्याचा ऑडिओ-व्हिडिओ पोस्ट करु शकता.

आईसाठी विशेष भाषणं
1.
विद्यार्थी मित्रांनो नमस्कार...
आज जागतिक आईदिवस किंवा जागतिक मातृदिन म्हणा... मी तुम्हाला आईची थोरवी सांगणार आहे..आई.. हे नाव खूपच छोटं अगदी दोन अक्षरी पण तिचं कर्तृत्व जगात सर्वात मोठं. ती मुलांना जन्मच देत नाही तर त्यांना एक व्यक्ती म्हणून घडवते. तिच व्यक्ती राष्ट्राच्या कामी येते. एका अर्थाने आई, राष्ट्राचा उद्धारच करत असते. कुटुंबात ती राबराब राबते स्वःत कष्ट उपसते आणि झिजते पण आपल्या मुलांना कधीही कोणतीही अडचण होऊ नये अशीच तिची धडपड असते. आई हे जसे नाव सारखेच तशी प्रत्येक आईची मायाही आपल्या मुलांप्रती सारखीच असते. अशा आईला माझा सांष्टांग दंडवत.
2.
मित्र मित्रांनो नमस्कार...
आज जागतिक मातृदिन..मी तर असे म्हणेल की, देव जरी मज कधी भेटला माग हवे जे माग म्हणाला, तर मी म्हणेल माझी आई सात जन्मी मला पुन्हा दे...आई ही आपल्या जीवनातील अशी व्यक्ती असते की, तुम्ही कितीही स्वार्थीपणे वागा ती तुमच्याशी निस्वार्थपणेच वागते. तिला तुमच्याशिवाय काहीच नको असते. आईचे उपकार थोर आहेत, जन्म दिल्यानंतर मुलं मातीच्या गोळ्यासारखे असतात पण ही आईरुपी शिल्पकार मातीतुन मुर्ती घडवते. मी तर असे म्हणेल की, या जगात चंद्र-सूर्यापेक्षाही मोठी गोष्ट काय असेल तर ती आई अन् तिची माया आहे. 10. चालताना लेकराच्या पायाला ठेच जरी लागली ना..त्रास ज्याच्या काळजात होतो ती असते आई..मुलांना घास भरवून उपाशी राहणारी फक्त आईच असते..मुलांनी खाल्लं तर तिचं पोट भरतं एवढा निस्वार्थपणा जगात फक्त एकाच माऊलीत ती म्हणजे आई .. शेवटी एवढेच म्हणेल की, आई... श्वासही तू,आसही तू,जगण्याचा विश्वासही तू! 'मदर्स डे'च्या हार्दिक शुभेच्छा!
3.
मित्र मित्रांनो नमस्कार...
आज जागतिक आईदिवस किंवा जागतिक मातृदिन... स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे उगाच म्हटले जात नाही. आई दोन अक्षरात जग सामावलेलं आहे. आपण जेव्हा जन्मतो तेव्हा आणि आपल्याला जेव्हा बोलायला येतं तेव्हा आपण सर्वात पहिला शब्द उच्चारतो तो आई...या शब्दातच एवढं सामर्थ्य आहे की, ते आयुष्यभर पुरतं. ती जन्माची शिदोरी असते. आईचे अनंत उपकार आपल्यावर असतात, आपण लहान असतो तेव्हा तिच्या कुशीत असतो आणि जेव्हा मोठे होतो तेव्हा शिक्षणासाठी दूर निघुन जातो. नंतर नोकरी करतो आणि जिथे गेलो तिथेच राहतो. तेव्हा आपल्या आईची अवस्था कशी होत असेल हे सांगायला नको..कारण चिमणी जशी पिल्लांची घरी येण्याची वाट पाहते अगदी तशीच आईही मुलं घरी कधी येतील याचीच वाट पाहत असतात. जगात असा धागा फक्त आई आणि मुलांमध्येच असतो. जी घरात असते पण तिचे लक्ष सातत्याने बाहेर असलेल्या मुलांकडेच असते. अगदी मुलं म्हातारी झाली तरीही..आज हे सांगताना डोळ्यात पाणी येतेय...म्हणून इथेच थांबतो. आईला माझा सांष्टांग दंडवत, आई तुझे थोर उपकार..
4.
मित्र मित्रांनो नमस्कार...
आज जागतिक मातृदिन... आपल्या आयुष्यातील सर्वात महान आणि आपल्यासाठी सर्वात लहान होणारी आईच असते... अशा आईबद्दलची थोरवी आणि तिच्यामुळेच आपण आहोत ही भावना कायम आपल्या मनात असायला हवी. आई ही दुधाची साय असते, वासराची गाय असते, लेकराची माय असते, ज्यांचे कुणी नाही त्यांची आई असते. अशा माझ्या आईमुळेच आज मी येथे उभा आहे. मुलाने थोडे जरी यश मिळवले ना त्याचा सर्वात जास्त आनंद आईला होत असतो आणि तीच असते जी साऱ्या जगाला ओरडून सांगते की, माझा मुलगा यशस्वी झाला. ती निस्वार्थपणाची नदी आहे आणि प्रेमाचा सागर आहे. अशा माऊलीचे उपचार मी फेडू शकणार नाही. आईला माझा सांष्टांग दंडवत












Click it and Unblock the Notifications