Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आत्ता निवडणूक झाली तर सत्ता कुणाची? 'या' सर्व्हेचा धक्कादायक रिपोर्ट; मोदीनंतर कोण, आले उत्तर

'मूड ऑफ द नेशन'चे सर्वेक्षण नुकतेच करण्यात आले. देशातील लोकांचा मूड जाणून घेण्यासाठी इंडिया टुडेने सी-व्होटरच्या सहकार्याने हा सर्वे केला. सध्याच्या परिस्थितीत आज जर लोकसभा निवडणुका झाल्या कोण पंतप्रधान असेल? सर्वोत्तम पंतप्रधान कोण? मोदींचे कामकाज किती जणांना आवडते? मोदीनंतर कोण? असे प्रश्न विचारुन त्यावर उत्तरे मागविण्यात आली होती. त्या सर्वेक्षणाचे आकडे नुकतेच जाहीर करण्यात आले.

C Voter Survey

कसे झाले सर्वेक्षण?

इंडिया टुडे आणि सी-व्होटरचे सर्वेक्षण 2 जानेवारी 2025 ते 9 फेब्रुवारी 2025 दरम्यान करण्यात आले. या सर्वेक्षणात 54,418 लोकांनी सहभाग घेतला. या सर्वेक्षणात लोकसभेच्या सर्व 543 जागांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय सी-व्होटरने गेल्या 24 आठवड्यात 70,705 लोकांची मते घेतली. अशा प्रकारे मूड ऑफ द नेशन अहवाल तयार करण्यासाठी एकूण 1 लाख 25 हजार 123 लोकांच्या मतांचे विश्लेषण करण्यात आले.

मोदी, गांधी, शहा की केजरीवाल?

'मूड ऑफ द नेशन' सर्वेक्षणानुसार, पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी हेच जनतेची पहिली पसंती असतील. 51.2 टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींच्या नावावर सहमती दर्शवली आहे. पंतप्रधान मोदींनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी हे पंतप्रधानपदासाठी जनतेची दुसरी पसंती होते. 24.9 टक्के लोकांनी राहुल गांधींच्या बाजूने मतदान केले. तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनाही 4.8 टक्के लोकांनी पंतप्रधानपदासाठी पसंती दिली. याशिवाय गृहमंत्री अमित शहा यांनाही 2.1 टक्के लोकांनी पंतप्रधानपदासाठी होकार दिला. नुक्त्यात झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या अरविंद केजरीवाल यांनाही 1.2 टक्के लोकांनी पसंती दर्शवली.

सर्वोत्तम पंतप्रधान कोण?

या सर्वेक्षणात आतापर्यंतचे सर्वोत्तम पंतप्रधान कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा 50.7 टक्के लोकांनी नरेंद्र मोदींना आतापर्यंतचे सर्वोत्तम पंतप्रधान म्हणून मत दिले. मनमोहन सिंग यांना 13.6 टक्के लोकांनी सर्वोत्तम पंतप्रधान म्हणून निवडले. 11.8 टक्के लोकांनी अटलबिहारी वाजपेयी यांना आतापर्यंतचे सर्वोत्तम पंतप्रधान म्हटले. 10.3 टक्के लोकांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नाव घेतले. तर 5.2 टक्के लोकांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना आतापर्यंतचे सर्वोत्तम पंतप्रधान म्हटले.

मोदीनंतर कोण?

पीएम नरेंद्र मोदी यांच्यानंतर बीजेपी कुणाला पंतप्रधान करेल? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर भाजपची दुसरी पसंती म्हणून 26.8 टक्के लोकांनी गृहमंत्री अमित शाह यांच्या नावाला पसंती दिली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पंतप्रधान मोदींचे राजकीय उत्तराधिकारी व्हावेत, अशी २५.३ टक्के लोकांची इच्छा आहे. 14.6 टक्के लोकांनी नितीन गडकरींना, 5.5 टक्के लोकांनी राजनाथ सिंह आणि 3.2 टक्के लोकांनी नरेंद्र मोदींनंतर शिवराज सिंह चौहान यांना पुढचा पंतप्रधान बनवण्याची इच्छा व्यक्त केली. आज लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप स्वबळावर सरकार स्थापन करू शकते, असे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+