दिल्ली विधानसभेपूर्वी मोदींचा मास्टरस्ट्रोक; जो विषय चर्चेतच नव्हता त्याला दिली थेट मंजुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत आठव्या वेतन आयोगाचा निर्णय नसतानाही, मोदींनी हा विषय घेत आठव्या वेतन आयोगाचे गठण करण्यास मंजुरी दिली. दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी घेतलेला हा निर्णय मोदींचा मास्टरस्ट्रोक समजला जात आहे. या निर्णयामुळे दिल्लीच्या निवडणुकांत भाजपला फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काय घेतला निर्णय?
आज गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीसाठी मोदींनी आठव्या वेतन आयोगाच्या गठणाला मंजूरी दिली. वास्तविक हा विषय अजेंड्यामध्ये नव्हता. तरीही मोदींनी हा विषय अचानक चर्चेत घेतला. अचानक हा निर्णय घेतल्याने मंत्रिमंडळालाही सुखद धक्का बसला. हा निर्णय केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
या होणार फायदा?
दिल्ली विधानसभेसाठी पाच फेब्रुवारीला मतदान होणार आहे. एकट्या दिल्लीत चार लाख सरकारी कर्मचारी आहेत. दिल्ली सरकार व संरक्षण विभागातील कर्मचाऱ्यांसाठी मोदींनी अचानक हा सुखद धक्का दिला आहे. त्यामुळे मोदींनी घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ५० लाख कर्मचारी व ६५ लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.
वेतन वाढणार?
दिल्ली सरकारमधील कर्मचाऱ्यांचे वेतन केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाबरोबर वाढते. त्यामुळे निवडणुकीत भाजपला तो फायदा होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप आणि भाजप यांच्यात लढत आहे. यासंदर्भात आलेल्या सर्व्हेमध्ये यंदा आपला सत्ता राखणे अवघड होणार असल्याचे दिसत आहे. त्यातच मोदींनी हा मास्टरस्ट्रोक मारल्याने दिल्लीतील चार लाख कर्मचाऱ्यांचा मतदानात फायदा होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.












Click it and Unblock the Notifications