Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आजही आपल्या देशातील खासदारांना पगार कमीच मिळतो, जगभरातील टॉप 10 देशांच्या खासदारांचे पगार घ्या जाणून

केंद्रातील मोदी सरकारने खासदारांना एक मोठं गिफ्ट दिलं आहे. केंद्र सरकारने सोमवारी (24 मार्च) खासदारांच्या पगारात घसघशीत वाढ जाहीर केली. 1 एप्रिल 2025 पासून खासदारांना 1 लाख रुपयांऐवजी 1.24 लाख रुपये वेतन मिळणार आहे. सरकारने खासदारांच्या पेन्शन आणि भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता दैनिक भत्ता 2000 रुपयांवरून 2500 रुपये करण्यात आला आहे.

खासदारांना घसघशीत पगार वाढ देण्यासोबतच मोदी सरकारने पेन्शन आणि भत्त्यातही वाढ केली आहे. त्यानुसार या निर्णयापूर्वी ज्या खासदारांचे पेन्शन 25,000 रुपये होते ते आता 31,000 रुपये करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, दोनदा किंवा तीन वेळा खासदार राहिलेल्यांचे अतिरिक्त पेन्शन 2000 रुपयांवरून 2500 रुपये करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातील टॉप 10 देशातील खासदारांचे वेतन जाणून घेऊया.

indian mps salary

टॉप 10 देशांच्या खासदारांचे पगार

जगातील पहिल्या 10 देशांमधील खासदारांचे वेतन भारतापेक्षा बरेच वेगळे आहे. या देशांमध्ये पगारासोबतच वेगवेगळ्या प्रकारे सुविधाही दिल्या जातात.

अमेरिका: अमेरिकन खासदारांना दरवर्षी सुमारे 1.45 कोटी रुपये (174,000 डॉलर्स) मिळतात. त्यांना मोफत राहण्याची सोय मिळत नाही, परंतु त्यांना कार्यालय आणि प्रवासासाठी वेगळे बजेट दिले जाते.

जपान: जपानी खासदारांना दरवर्षी सुमारे 1.5 कोटी रुपये मिळतात. त्यांच्यासाठी असलेल्या अतिरिक्त सुविधाही खूप चांगल्या आहेत.

इंग्लंड: ब्रिटिश खासदारांचे वेतन दरवर्षी सुमारे 78 लाख रुपये (93,904 पौंड) आहे. त्यांना घरभाडे भत्ता मिळतो पण मोफत राहण्याची सोय नाही.

जर्मनी: जर्मन खासदारांचे वेतन दरवर्षी सुमारे 1.1 कोटी रुपये आहे. त्यांना कार्यालय आणि कर्मचाऱ्यांची देखभाल करण्यासाठी बजेट मिळते.

ऑस्ट्रेलिया: खासदारांचे वेतन दरवर्षी सुमारे 1.3 कोटी रुपये आहे. त्यांना प्रवास आणि कार्यालयीन खर्चासाठी भत्ता मिळतो.

फ्रान्स: फ्रेंच खासदारांना दरवर्षी सुमारे 70 लाख रुपये मिळतात. त्यांच्या सुविधाही चांगल्या आहेत.

कॅनडा: कॅनडाच्या खासदारांना दरवर्षी सुमारे 1.2 कोटी रुपये मिळतात. त्यांच्या सुविधाही भारतापेक्षा चांगल्या आहेत.

इटली: येथील खासदारांचे वेतन दरवर्षी सुमारे 1 कोटी रुपये आहे.

दक्षिण कोरिया: कोरियन खासदारांना दरवर्षी सुमारे 90 लाख रुपये मिळतात.

सिंगापूर: सिंगापूरमधील खासदारांना सर्वाधिक वेतन मिळते, जे दरवर्षी 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

खासदारांच्या वेतनाच्या बाबतीत भारताचा क्रमांक कितवा?

जगभरातील काही देशांच्या तुलनेत भारतीय खासदारांचे वेतन खूपच कमी आहे. जर आपण फक्त पगारावर नजर टाकली तर भारताचे दरमहा 1.24 लाख रुपये (वार्षिक 14.88 लाख रुपये) या अव्वल देशांपेक्षा खूप मागे आहे. परंतु जर मोफत निवास, प्रवास आणि इतर भत्ते जोडले तर ही रक्कम दरवर्षी 40 लाख रुपये वाढते. तरीही ते अमेरिका, जपान किंवा सिंगापूर सारख्या देशांपेक्षा कमी आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+