Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्तींच्या बिजबेहरा मतदारसंघात जोरदार मतदान, गड वाचवणार का?

Iltija Mufti Seat Srigufwara-Bijbehara Voting : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुका 2024 मध्ये पहिल्या टप्प्यात 24 जागांसाठी आज 18 सप्टेंबर रोजी मतदान होत आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत 41 टक्के मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यात जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती या बिजबेहारा मतदारसंघातून उमेदवार आहेत.

श्रीगुफवारा-बिजबेहारा मतदारसंघ, जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुका 2024 मधील हायप्रोफाईल जागांपैकी एक सीट्स मानली जाते. सकाळी 11 वाजेपर्यंत 27.60 टक्के मतदान झाले आहे. इल्तिजा मुफ्ती यांची जागा श्रीगुफ्वारा-बिजबेहारा ही जागा अनंतनाग जिल्ह्यात येते. बिजबेहरा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे.

Jammu and Kashmir Assembly Election 2024

इल्तिजा मुफ्ती यांचा परिचय

  • वय-37 वर्षे
  • शिक्षण-पदव्युत्तर. दिल्ली विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदवी आणि इंग्लंडच्या वॉर्विक विद्यापीठातून पीजी.
  • आई-मेहबूबा मुफ्ती, माजी मुख्यमंत्री जम्मू काश्मीर
  • नोकरी-लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत.
  • चर्चा- 18 सप्टेंबर 2019 रोजी, जेव्हा आई मेहबूबा मुफ्ती यांना सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत ताब्यात घेण्यात आले, तेव्हा इल्तिजा तिच्या ट्विटमुळे चर्चेत आली.
  • बिजबेहारा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेल्या इल्तिजा तिची आई मेहबूबा यांच्या मीडिया सल्लागारही आहेत.

श्रीगुफवारा-बिजबेहारा मतदारसंघाचा इतिहास

जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील श्रीगुफ्वारा-बिजबेहरा या जागेने दोन मुख्यमंत्री दिले आहेत. एक मोहम्मद सईद आणि दुसरी मेहबूबा मुफ्ती. इल्तिजा मुफ्ती या त्यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी आहे, जी श्रीगुफवारा-बिजबेहारा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. गेल्या २५ वर्षांपासून या जागेवर मुफ्ती कुटुंब आणि पीडीपीचा कब्जा आहे. बिजबेहरा जागेवर 1967 पासून 9 वेळा विधानसभा आणि पोटनिवडणुका झाल्या. यापैकी मुफ्ती कुटुंबीय किंवा पीडीपीचे उमेदवार 6 निवडणुकांमध्ये विजयी झाले आहेत. नॅशनल कॉन्फरन्सला आतापर्यंत केवळ तीन वेळा विजय मिळवता आला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+