बांगलादेशातील हिंदूं अत्याचारावर मौन, पण मतांसाठी संभल-संभल सुरू; मायावतींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल
Mayawati Attack on Congress over Bangladesh Hindu and Sambhal Masjid Controversy : बहुजन समाज पक्षाच्या (BSP) प्रमुख मायावती यांनी शनिवारी बांगलादेशच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल चढवला. बांगलादेशच्या मुद्द्यावर काँग्रेस मौन बाळगून मुस्लिम मतांसाठी सावधपणे संभल संभल ओरडत असल्याचा आरोप मायावती यांनी केला.
त्या म्हणाल्या की, सपा आणि काँग्रेस पक्ष संभलमधील हिंसाचाराच्या निमित्ताने मुस्लिम मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणात काँग्रेस, सपा आणि त्यांचे समर्थक एकाच ताटात आहेत. अशा स्थितीत भाजपच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या केंद्र सरकारने पुढे जाऊन आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. जेणेकरुन शोषणाचा बळी ठरणाऱ्या दलित वर्गातील लोकांना आणखी त्रास सहन करावा लागू नये. काँग्रेसच्या चुकीमुळे त्यांना नुकसान सोसावे लागू नये.

बांगलादेशातील सरकारशी बोलून तेथील लोकांना भारतात परत आणले जावे, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, संसदेतील विरोधी पक्ष राष्ट्रीय आणि जनहिताचे मुद्दे उपस्थित करण्याऐवजी संभलमधील हिंसाचाराचे निमित्त करून मुस्लिम मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत, विशेषत: सपा आणि काँग्रेस पक्ष. त्यांचा इतर मुद्द्यांशी काहीही संबंध नाही.
एवढेच नाही तर संभलमध्ये हे पक्ष मुस्लिम समाजाला आपसात लढायला लावत आहेत. मुस्लीम समाजालाही सतर्क राहावे लागेल, त्याहून अधिक दुःखाची बाब म्हणजे दलित वर्गाच्या खासदारांना संसदेत आणणारे लोकही आपल्या पक्षाच्या बॉसला खूश करण्यासाठी दलित अत्याचाराच्या मुद्द्यांवर मौन बाळगून आहेत, ही मोठी शोकांतिका आहे, असेही त्या म्हणाल्या.












Click it and Unblock the Notifications